वाडे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न.

(कार्यकारी संपादक – संजय महाजन)
भडगांव:- तालुक्यातील वाडे येथील माध्यमिक विद्यालयाच्या सन १९८५ या वर्षातील दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा नुकताच गिरणाकाठावरील निसर्गरम्य वातावरणात श्रीक्षेत्र ऋषीपांथा बहाळ येथे नुकताच उत्साहात संपन्न झाला. शाळेतील मस्ती,एकत्रित केलेला अभ्यास,शिक्षकांनी दिलेली शिक्षा अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. जवळपास ३९ वर्षानंतर जुने मित्र मैत्रिणी एकत्र आले होते. माध्यमिक विद्यालय वाडे या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण,उद्योग, शिक्षण,सांस्कृतिक,सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात काम करीत असुन आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुञसंचलन विद्यालयाचे माजी विदयार्थी तथा जळगाव ग.स.चे संचालक सुनिल निंबा पाटील यांनी केले. कार्यक्रमास सुरुवातीस मयत झालेल्या माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक एस.एस.पाटील यांचा विद्यार्थ्यांकडुन रुमाल, टोपी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन हभप.धनंजय महाराज ऋषीपांथा उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास आलेले सर्व माजी विद्यार्थीनी बहीणींना भावांकडुन माहेरची साडी आहेर म्हणुन देण्यात आली. तसेच सर्व माजी वर्गमिञांचाही रुमाल,टोपी देऊन सत्कार करण्यात आला.
वर्गमित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांनी आपला परिचय दिल्यावर त्या वेळेच्या काही गमतीदार आणि काही चांगल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी पञकार अशोक परदेशी यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत माजी विद्यार्थी म्हणुन या आजच्या भरलेल्या शाळेत बसायला मिळाल्याचे सांगितले. माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपले मनोगत मांडून आमचे जिवन घडविणाऱ्या गुरुजनांचे ऋण व्यक्त केले. यावेळी अध्यक्षीय मनोगतातुन माजी मुख्याध्यापक एस.एस.पाटील यांनी आपले विचार मांडत तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे, परिवाराला वेळ देणे, आपली स्वतःची प्रगती करणे याबाबत मार्गदर्शन करीत आपले अमुल्य विचार मांडले.
या कार्यक्रमासाठी जवळपास ३० माजी विद्यार्थी व माजी शिक्षक एस.एस.पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. यावेळी दिलीप महाजन, बाळासाहेब पाटील,संजय पाटील,रमेश पाटील,गोरख परदेशी,विलास महाजन,संजय परदेशी आणि पुष्पा अमृतकार, वंदना परदेशी,छाया परदेशी, आशा पाटील,छाया पाटील, आरती चौधरी आदी माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. साऊंडसिस्टीम व भोजन व्यवस्थेसाठी वाडे येथील नितीन भोई यांच्या टीमसह माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी विशेष परीश्रम घेतले व आभार अजय विष्णु चौधरी यांनी मानले.