भवाळी येथील अंगणवाडीतील पोषक आहार धान्य नुकसानीस जबाबदार कोण?

भवाळी येथील अंगणवाडीतील पोषक आहार धान्य नुकसानीस जबाबदार कोण?
संपादक राजेंद्र न्हावी.
चाळीसगाव तालुक्यातील भवाळी येथील
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प २ चाळीसगाव अंतर्गत येणाऱ्या सरस्वती अंगणवाडी क्र १ येथे लहान मुलांना दिला जाणारा पोषक आहार अत्यंत खराब कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले.
यावर सत्यकाम न्युज चे प्रतिनीधी यांनी दिनांक २७ ऑगस्ट रोजी, गोपनीय सूत्राच्या आधारे मिळालेल्या माहिती नुसार सविस्तर व्हिडिओ सहित बातमी घेतली होती. त्यात खरोखर अंगणवाडी पोषक आहाराचे धान्य हे कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.
सविस्तर बातमी अशी की, चाळीसगाव तालुक्यातील भवाळी येथे सरस्वती अंगणवाडी क्र १ मध्ये लहान मुलांचे पूरक पोषक आहार अतिशय दुर्गंधीमय अवस्थेत आढळून आले. यावर गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, हा प्रकार खूप गंभीर असल्याचे म्हटले आहे. ही अंगणवाडी इमारत अगोदरच जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या अंगणवाडीचे छत पूर्ण
पने पावसाळ्यात गळत, त्यामुळे पावसाळ्यात मुलांना बसवावे कुठ ? हा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. ह्या छत गळतीमुळे हे अन्न खराब झाले. आम्ही वारंवार ग्रामपंचायत ला तोंडी बोलून, अर्ज फाटे करून विनवणी केली. मात्र आज पर्यंत अंगणवाडी इमारतीचे काम किंवा दुरुस्ती सुरू झाली नाही. असे यावेळी गावातील नागरिकांनी सांगितले.
,
कुजलेल्या पोषक आहार. (धान्य) यास जबाबदार कोण?
सविस्तर बातमी घेतली असता, पोषक आहार हा खराब व कुजलेला दुर्गंधीमय अवस्थेत दिसून आला. त्यामुळे हा आहार चे काय होणार? त्या जागी दुसरा आहार उपलब्ध होणार का? की, तोच आहार मुलांना खायला दिला जाणार, असे अनेक प्रश्न सुज्ञ नागरिकांच्या वतीने निर्माण केले जात आहे.
यात ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता ग्रामस्थांनी सर्वस्व जबाबदार ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत ने ज्या ठेकेदारास काम दिले आहे. तो ठेकेदार जबाबदार आहे असे गावातील अंगणवाडी सेविका व नागरिकांनी सांगितले. विहित कालावधीत इमारतीचे काम सुरू झाले असते तर आज हे अन्न खराब झाले नसते असे प्रखर मत गावातील नागरिकांनी व्यक्त केले.
या बाबत लवकरात लवकर संपूर्ण चौकशी करावी व उत्कृष दर्जाचा पोषक आहार देण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा इशार पालक वर्गाने दिला आहे.