शिंदी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाई ठार.

शिंदी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाई ठार.
प्रतिनीधी वाल्मीक गरूड…
चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सुमारे २५ हजार किंमतीची गाई ठार झाली.
आपल्या घरापासून किमान १०० /२०० मीटर अंतरावर बांधून ठेवलेल्या गाईवर रात्री च्या दरम्यान बिबट्याने हल्ला केल्याने, शेतकरी आतिश सुभाष फाटे यांच्या गाईचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी सहा दरम्यान शेतकरी शेण पाणी करण्यासाठी गेले असता, खुंट्या जवळ त्यांना त्यांची गाय ही रक्त भांबाळ अवस्थेत मृत अवस्थेत आढळून आली. हे बघताच शेतकऱ्याची पाया खालची जमीनच सरकली. ही बातमी गावात कळताच गावातील नागरिकांनी घटनस्थळी गर्दी केली होती.
काही दिवसापासून परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या अगोदर सुद्धा भाऊलाल दंगा पवार यांच्या शेतात त्यांनी बघितला होता. आता शेतातील पिके मोठीं झालेली असल्याने बिबट्याने मक्का पिकात शिरकाव करत पळ काढला होता. सतत कुठ तरी बिबट्याची बातमी सतत कानावर येत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरात बिबट्याची दहशत येवढ्या प्रमाणावर पसरली आहे की, शेती साठी मजूर वर्ग सुद्धा मोठ्या मोठ्या पिकांमध्ये एकटे काम करण्यासाठी घाबरत आहे. वेळीच मोठी हानी होऊ नये म्हणून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.