भडगाव माळी पंच मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर….

अध्यक्षपदी मुकुंदा महाजन तर सचिव पदी प्रविण महाजन..
कार्यकारी संपादक – संजय महाजन..
भडगाव – शहरातील माळी समाज पंच मंडळाची बैठक नुकतीच लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालय येथे पार पडली. या बैठकीत संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यासंदर्भात तसेच दरवर्षी प्रमाणे नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
बैठकीत समाजाच्या उन्नती साठी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच एकमताने माळी पंच मंडळाची नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात आली. यावेळी माळीसमाज पंच मंडळ अध्यक्ष पदी मुकुंदा महाजन, उपाध्यक्ष पदी प्रकाश महाजन, अॅड विजय महाजन, सचिव प्रवीण महाजन सर, सदस्य राहुल महाजन, दत्तात्रय महाजन, धनंजय महाजन, अनिल महाजन, शिवदास कौतिक महाजन, गोपाल महाजन, शुभम महाजन, पुंडलिक महाजन, आदींची कार्यकारणीत निवड करण्यात आली.
सदर बैठकीस साहेबराव महाजन, भिकन महाजन, सुरेश रोकडे सर, विनोद महाजन, गणेश माळी, अरुण महाजन, पत्रकार सागर महाजन, अनिल महाजन, अशोक माळी, गोकुळ महाजन, प्रदीप महाजन, रमेश महाजन, मनोज महाजन, जीवन महाजन, प्रा.राहुल महाजन, प्रकाश महाजन, गोविंद महाजन, गुलाब महाजन बाळासाहेब महाजन, संतोष महाजन, रमेश महाजन, संतोष पाटील, दिनेश महाजन, मधुकर महाजन आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.