लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने समाधान चौधरी यांनी ४० वृक्षांची केली लागवड.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने समाधान चौधरी यांनी ४० वृक्षांची केली लागवड.
प्रतिनिधी – इम्रान शेख.
कासोदा – वाढदिवस, लग्नवाढदिवस च्या दिवशी मोठमोठे केक कापणे, दारू, चिकन मटण ची पार्टी या सर्व बाबी आपण बघितल्या असेल, पण याला कासोदा येथील युवा उद्योजक शिवसेना शहर प्रमुख (उ.बा.ठा.) श्री समाधान चौधरी यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने ४० वृक्षांचे रोपण केल्याने एक आगळा वेगळा संदेश समाजाला दिला आहे.
समाधान चौधरी यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने वेगवेगळ्या ४० वृक्षांचे रोपण आपल्या स्वतःच्या खाजगी जागेत केले. या रोपांना खत व पाणी ते वर्षभर काळजीने पूरवतील अशी हि त्यांनी हमी घेतली.
समाधान चौधरी यांनी एक दोन नव्हे, तब्बल ४० रोपं लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने लावलीत, त्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पावसाळ्यात एक-दोन रोपं सर्वांनीच लावावे, जिवलग मित्राचा , परिवारातील सदस्यांचा, पत्नीचा स्वतःच्या, वाढदिवसाला किमान ३/५ झाडे लावा असा संदेश हि त्यांनी दिला.