लोहारा येथील जेष्ठ पत्रकार व दिशा लाईव्ह न्यूजचे संपादक श्री दिनेश चौधरी यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या पाचोरा तालुका मुख्य संपर्क प्रमुख पदी निवड.
लोहारा येथील जेष्ठ पत्रकार व दिशा लाईव्ह न्यूजचे संपादक श्री दिनेश चौधरी यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघच्या पाचोरा तालुका मुख्य संपर्क प्रमुख पदी निवड.
पाचोरा – पाचोरा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघाच्या पाचोरा तालुका मुख्य संपर्क प्रमुख पदी पाचोरा येथील राज्य स्तरावर कार्यरत असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने लोहारा, ता.पाचोरा येथील जेष्ठ पत्रकार व दिशा लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक श्री दिनेश सोनजी चौधरी यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र भडगाव तालुका अध्यक्ष संजय मोरे (सरकार) व तालुका मुख्य संघटक अमीन पिंजारी यांच्या वतीने मिळाले आहे.
भारतीय संविधान व भारतीय कायदे व संघटनेची आचारसंहिता पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या असून सदरील पद नियुक्ती ही तीन वर्षासाठी( 28-6-2024 ते 17-6-2027 ) या कालावधीसाठी असून मानद स्वरूपाची असल्याचे संघटनेने कळवले आहे.
या निवडी बद्दल सर्व स्थरावरून श्री दिनेश चौधरी यांचे अभिनंदन केले जात आहे.