Breaking
जळगाव

विक्रीसाठी आणलेल्या दोन मोटारसायकली चाळीसगांव शहर पोलीसांकडून जप्त.

0 7 5 7 9 7

विक्रीसाठी आणलेल्या दोन मोटारसायकली चाळीसगांव शहर पोलीसांकडून जप्त.

उपसंपादक – कल्पेश महाले

चाळीसगांव – दिनांक ८/०६/२०२४ रोजी श्री.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगांव, यांच्या आदेशाने व कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगांव, श्री.अभयसिंग देशमुख, सहायक पोलीस अधीक्षक चाळीसगांव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरात पोलीस स्टेशन हद्दीत सक्त पेट्रोलिंग करण्याची मोहीम राबविण्यात आली होती.

वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हद्दीत सक्त पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, बेलखेडा ता.कन्नड येथील दोन इसम हे दोन मोटार सायकली मार्केट कमिटी परीसरात विक्री करीता येणार आहे. याबाबत माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री.संदिप पाटील यांचे मार्गदर्शानाखाली त्वरित पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीची खात्री करण्याकरीता रवाना होवुन मार्केट कमिटी परीसरात जावुन अंधारात थांबले असता रात्री ९:३० वाजता च्या सुमारास दोन इसम हे त्यांचे ताब्यात दोन मोटार सायकली घेवुन मार्केट कमिटीचे आत आले. तेव्हा त्यांना जागीच पकडुन त्यांचे ताब्यातील मोटार सायकलींबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली.

संशयितांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे बापुजी उर्फ लखन बळीराम राठोड वय- ३५ रा. बेलखेडा तांडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर, व विवेक गणु आडे वय- ३३ रा. बेलखेडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर असे सांगितले. वरील इसमांच्या ताब्यात ५०,०००/- रु. किंमतीच्या दोन मोटार सायकली (प्लॅटीना, फॅशन प्रो) अशा मिळुन आल्याने सदर इसमाविरुध्द पो.कॉ समाधान पाटील यांचे फिर्यादीवरुन गुरनं. २४८/२०२४ महा.पोलीस अधिनियम कलम- १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीतांचे ताब्यात मिळालेल्या मो.सा. हे जप्त करण्यात आले आहेत.‎

सदर मोटर सायकल कल्याण, ठाणे येथून चोरी केल्याची माहिती मिळाली आहे. सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक, श्री.संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ राहुल सोनवणे, पो.हे.कॉ अजय पाटील, पो.ना भुषण पाटील, पो.ना महेंद्र पाटील, पो.कॉ विजय पाटील, पो.कॉ आशुतोष सोनवणे, पो.कॉ रविंद्र बच्छे, पो.कॉ पवन पाटील, पो.कॉ ज्ञानेश्वर गिते, पो.कॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पो.कॉ समाधान पाटील, पो.कॉ राकेश महाजन, पो.कॉ मनोज चव्हाण यांचे पथकाने केली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ अजय पाटील व पो.कॉ ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 7 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे