भऊर ! धुळे रेल्वे लाईन परिसरात चाळीसगाव महसूल विभागाकडून मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त….
भऊर ! धुळे रेल्वे लाईन परिसरात चाळीसगाव महसूल विभागाकडून मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त….
प्रतिनिधी कल्पेश महाले चाळिसगाव
चाळीसगाव – भऊर गावाजवळ धुळे रेल्वे लाईन परिसरात चाळीसगाव महसूल विभागाकडून मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त करण्यात आला. या मुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
चाळिसगाव महसूल विभागाला भऊर गावाजवळ धुळे रेल्वे लाईन परिसरात मोठा वाळूचा साठा असल्याचे गुप्त माहिती नुसार कळाले, माहिती आधारे अप्पर तहसिलदार श्री.जगदीश भरकर, महसुल कारकुन श्री.मुबारक पठाण, जामदा तलाठी श्री.प्रशांत कनकुरे यांनी भऊर गावाजवळी शिदवाडी शिवारात धुळे रेल्वे लाईन लगत भागात घटनास्थळी जाऊन सदरील हा वाळूसाठा जप्त केला.
जप्त केलेली वाळू ही गिरणा नदीपात्रातून चोरून उपसा करून मोठ्या प्रमाणात थप्पा मारून ठेवला होता. त्यातच तो गोपनीय सूत्रांच्या नजरेस आल्याने सदर वाळू साठा जप्त करत कारवाई करण्यात आली.