चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांची भडगाव येथे वाळू चोरांवर धडक कारवाई…

चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांची भडगाव येथे वाळू चोरांवर धडक कारवाई…
प्रतिनिधी कल्पेश महाले चाळीसगांव
चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक, अभयसिंह देशमुख यांना भडगांव पोलीस स्टेशन हद्दीत वाक गावाजवळ गिरणा नदी पात्रात काही लोक बेकायदेशीररित्या अवैध वाळु उपसा करुन तीची वाहतुक करत आहेत, अशी गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली. त्या अनुषंगाने कायदेशीर कार्यवाही करणेकामी आम्ही पथकासह रवाना होवुन सदर ठिकाणी पोहचुन आम्ही तात्काळ भडगांव तहसील कार्यालयाकडील पथकास बोलावुन घेतले व त्यांचे सह पायी जावुन खात्री केली असता त्यावेळी आम्हाला गिरणा नदी पात्रातली वाळु एका जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर मध्ये भरतांना दिसले व एक जेसीबी नदी काठावर साठा करुन ठेवलेली वाळु डंपर मध्ये भरतांना दिसले. वाळु चोरी बाबत खात्री होताच आम्ही व पथकाने दिनांक २५/०२/२०२४ रोजी रात्री ००.१५ वाजता त्यांचेवर अचानक छापा टाकला.
सदर ठिकाणी वाळुने भरलेले टाटा कंपनीचे ५ डंपर, ५ स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर-, ५ ट्रॅक्टर ट्राली, २ जेसीबी, असा एकुण १,५४,००,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व आरोपी १) संदीप मुरलीधर पाटील, वय-४१, रा. वडगांव सतीचे, ता भडगांव, २) अक्षय देवीदास मालचे, वय-२०, रा भडगांव खालची पेठ, भडगांव, ३) प्रविण विजय मोरे, वय-२०, भडगांव वरची पेठ, भडगांव, ४) मच्छिद्र गिरधर ठाकरे, वय-२१, ५) ललीत रामा जाधव, वय-२२, रा यशवंती नगर, भडगांव, ६) शुभम सुनिल भिल, वय-२१, रा. यशवंत नगर, भडगांव, ७) रणजीत भास्कर पाटील, रा. महींदळे, भडगांव असे मिळून आले.
त्यांना विचारपुस केली असता त्यांनी आम्ही रवी पवार उर्फ रवी पंचर रा भडगांव याचे सांगणेवरुन वाळु चोरी करत आहोत. असे सांगीतल्याने सदर इसमांना व वाहनाना ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द पोकॉ/७१५ राहुल राजेंद्र महाजन, नेमणुक चाळीसगांव ग्रामीण पोस्टे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन भडगांव पोलीस स्टेशनला गु.र.नं ५०/२०२४ भादवि कलम ३७९,३४, व महाराष्ट्र जमीन महसुल संहीता, १९६६ चे कलम ४८ (७), ४८(८) तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ चे कलम १८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील मुख्य आरोपी रवि पंचर याचा शोध घेणे चालु आहे. सदर पथकात आमचे सोबत १) सपोनि.तुषार देवरे, २) पोना/१४०५ राजेंद्र अजबराव निकम, ३) पोहेकॉ/१४४० भगवान पाटील, ४) पोकॉ/३०४१ विकास पाटील, ५) पोकॉ/२८०३ विश्वनाथ सुधाकर देवरे ६) पोकॉ/३३८४ महेश अरविंद बागुल, ७) पोकॉ/२२१ चेतन नानाभाऊ राजपुत, ८) पोकॉ/१९१ सुनिल मोरे, ९) पोकॉ/९०६ श्रीराम विट्टल कांगणे, १०) पोकॉ/१६२२ नंदकिशोर शिवराम महाजन, ११) पोकॉ/५२० सुदर्शन घुले, १२) पोकों/९०६ श्रीराम विठ्ठल कांगणे, १३) पोकॉ/७१५ राहुल राजेंद्र महाजन, १४) पोकॉ/४४७ समाधान पोपट पाटील, असे अधिकारी व अमंलदार सहभागी असुन सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक जळगाव श्री. डॉ. महेश्वर रेड्डी सर, अप्पर पोलीस अधिक्षक, चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
यापुढे देखील अशा प्रकारची अवैध वाळु चोरी विरुध्द धडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचा मानस श्री. अभयसिंह देशमुख साहेब यांनी व्यक्त केला आहे.
संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात मोठी ही धडक कारवाई आहे आणि या कारवाईमुळे वाळू चोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.