शिवजयंतीची पुर्वतयारी; मेहुनबारे पोलिसांकडून गावात सिंघम स्टाईल रुटमार्च.

प्रतिनिधी कल्पेश महाले.
मेहुनबारे ता.चाळीसगाव १९ फेब्रुवारी, छत्रपती शिवरायांचा जन्मदिन. राज्यभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रत्येक शहरामध्ये व गावांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मेहुनबारे पोलिसांनी सिंघम स्टाईल रूट मार्च काढला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मेहुनबारे पोलिसांच्या वतीने गावात पोलिसांचा सिंघम स्टाईल रूट मार्च काढण्यात आला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे त्याचबरोबर पोलिसांना मिरवणुकीचा आणि शिव पालखीचा मार्ग माहिती व्हावा यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला होता.
मेहुनबारे गावातील नवेगाव परिसरातून संपुर्ण गावातून मेहुनबारे पोलीस स्टेशन परिसरात हा रूट मार्च काढण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड लाठी काठी घेउन मोठ्या संख्येत उपस्थित होते. कायद्या व सुव्यवस्था बिघडवणाऱ्याच्या मनात धडकी निर्माण व्हावी यासाठी पोलिसांचा सिंघम स्टाईल पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला होता.
दरम्यान यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदिप परदेशी, पोलीस उपनिरीक्षक शिरोळे, आणि पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, होमगार्ड उपस्थित होते.