चाळीसगांव शहर सुरक्षित शहर या उपक्रमाअंतर्गत बिट चौकीचे उदघाटन व नूतनीकरण…

कल्पेश महाले ता.प्रतिनिधी
चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन स्थापनेपासून चाळीसगांव शहरात घाटरोड चौकी व स्टेशनरोड चौकी हयाच ०२ बिट चौकी अस्तित्वात होत्या व तेथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. चाळीसगांव शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शहरातील बिट चौकी इमारती बांधकाम करणे गरजेचे होते. बिट चौकी इमारत असल्यास पोलीस अंमलदार सदर बिट चौकीत उपस्थित राहील्यास नागरीकांच्या तात्काळ अडचणी सोडविण्यास मदत होवून, गुन्हयांना वेळीच आळा घालता येईल.
तसेच स्थानिक नागरीकांना बिट चौकी असल्यास त्यांनाही पोलीसांची मदतं तात्काळ घेता येते. त्यामुळे चाळीसगांव शहरात असणारे पातोंडा बिट व खरजई बिट यांना इमारत करणे आवश्यक होते. तसेच घाटरोड व स्टेशनरोड बिट चौकीना प्राथमिक सुविधा देणे महत्वाचे होते. चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना सदर बाब लक्षात आल्यानंतर मा.आमदार श्री.मंगेश चव्हाण यांना सदर बाब लक्षात आणून देवून, आमदार निधीतून मदत देण्यात यावी अशी विनंती पूर्वक मागणी केली. मा.आमदार श्री मंगेश चव्हाण यांनी पोलीसांच्या मागणीस तात्काळ दुजोरा देवून आमदार निधीतून करगांव बोगदयाजवळील खरजई चौकी व खरजई नाक्यावरील पातोंडा बिट चौकी यांचेकरीता नविन इमारत बाधून दिलेली आहे.
तसेच घाटरोड व स्टेशनचौकी यांच्यामध्ये शौचालय व दुरूस्त्या करून त्यांचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. सदर बिट चौकीचे उदघाटन आज दिनांक 28/01/2024 रोजी मा.अपर अधिक्षक, श्री अशोक नखाते सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख, चाळीसगांव भाग यांचे प्रमुख उपस्थितीत मा. श्री. मंगेश चव्हाण यांचे हस्ते पार पडले. सदर कार्यक्रमास चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ढिकले, श्री. टकले, श्री. बिरारी,पोलीस उप निरीक्षक- श्री आव्हाड, श्री. घुले व अंमलदार उपस्थित होते.
चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत वर्ष २०२४ चाळीसगांव शहर सुरक्षित शहर या उपक्रमाअंतर्गत काम करीत असून, त्यात नागरीकांमध्ये जागरूकता करण्याचे प्रयत्न करीत आहे. सदर प्रयत्नांत ०१ कॅमेरा पोलीसांकरीता, बस स्थानकावर व मुख्य बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी गस्त ठेवण्यात येते. चाळीसगांव शहरातील सर्व बॅकेची वॉचमन व पदाधिकारी यांचा व्हॉटसअॅप ग्रुप तयार करून तात्काळ संशयीत इसम यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. दर्गा परीसारात नियमीत गस्त ठेवून नियमित संशयीतांवर नजर ठेवण्यात येत आहे. दिवसा व रात्रीचे रिक्षाचालक, लॉजधारक यांना मार्गदर्शन करून कोणी संशयीत शहरात आल्यास तात्काळ माहीती देण्यास सांगितले आहे. तसेच चाळीसगांव तालूका भडगाव, पाचोरा, कन्न्ड, नागद, मालेगाव, नांदगाव, धुळे या तालुक्यातील पोलीस पाटलांचे लवकरच व्हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यात येत आहे.
चाळीसगांव शहर सुरक्षित शहर या उपक्रमाअंतर्गत आव्हान करण्यात येते की, कोणताही अनुचित प्रकार व घटना घडत असल्यास चाळीसगांव शहर पोस्टे फोन किंवा डायल ११२ वर संपर्क करावा. जेणेकरून चाळीसगांव शहर सुरक्षित ठेवण्या
स मदत होईल.