Breaking
गुन्हेगारीजळगाव

ATM मधील रोकड चा अपहार करणारे आरोपीना अटक करुन रोकड व मुद्देमाल जप्त.

0 7 5 0 2 3

प्रतिनिधी कल्पेश महाले.

दिनांक १८/१२/२०१३ रोजी १) प्रविण देविदास गुरव वय ३८ वर्षे रा. पाटणादेवी रोड आदित्यनगर चाळीसगाव, २) दिपक भिकन पवार वय ३४ वर्षे रा. पाटणदेवी रोड आदित्यनगर चाळीसगाव, ३) चंद्रशेखर एकनाथ गुरव वय ४३ वर्षे रा. गुजराल पेट्रोलपंपाजवळ, निवृत्ती नगर जळगाव यांचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुरन ५७६/२०२३ भादवी कलम ४०८, ४०९, ४६८, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.

नमूद गुन्ह्यातील  आरोपी क्र. ०१ व ०२ हे सिक्युर हॅल्यु इंडीया लिमीटेड या खाजगी कंपनिमार्फत कस्टोडीयन म्हणून बँकामधून कॅश काढून ATM मशीनमध्ये भरण्याचे काम करीत असतात. त्याकरीता सबंधित कंपनी ही कस्टोडीयन कडे विश्वासाने बँकेमार्फत कॅश सोपवित असते. आरोपी क्रमांक ०१ व ०२ यांनी ATM मध्ये कॅश भरतांना माहे मे २०२३ ते डिसेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी थोड़ी-थोडी करुन एकुण ६४,८२,२००/- रुपयांचा अपहार करून सदरची रक्कम आपसात वाटुन घेवुन तिची विल्हेवाट लावली आहे.

तसेच आरोपी क्रं. ०३ यास कंपनितर्फे आरोपी क्र. ०१ व ०२ यांचेवर नियंत्रण ठेवणे व ऑडीटर म्हणुन नेमलेले होते. परंतु त्याने आरोपीना मदत करुन कंपनिला खोटे ऑडीट अहवाल तयार करुन पाठविले. तसेच आरोपी क्रं. ०४ याने आरोपी क्रं. ०१ याचेकडून अपहार केलेल्या रक्कमेतून एकुण १४,००,०००/- रुपये घेतले आहेत, म्हणून त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.

सदर गुन्ह्याचा सखोल तपास करुन गुन्हयातील अपहार केलेली रक्कम हस्तगत करणेबाबत मा. पोलीस अधिक्षक सो. श्री एम. राज कुमार, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांनी योग्य त्या मार्गदर्शनपर सुचना दिलेल्या आहेत.

नमुद गुन्ह्याचा तपास व गुन्ह्यातील अपहार केलेली रक्कम हस्तगत करणेकामी श्री संदिप पाटील पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शानाखाली एक पथक तयार केले होते. नमुद पथकामध्ये श्री सुहास आव्हाड पोलीस उप- निरीक्षक व पथकातील पोहेकॉ १७२० राहुल सोनवणे, पोहेकॉ २६५ योगेश बेलदार, पोना ३१३६ महेंद्र पाटील, पोना ३१२२ दिपक पाटील, पोकों १७४१ उज्वलकुमार म्हस्के, पोकों ५५२ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकों ९९४ विनोद खैरणार, पोकों २०८ आशुतोष सोनवणे, पोकों २३६७ अमोल भोसले व मपोकों ३२८2 सबा शेख यांची नेमणुक करण्यात आली होती.

तपासादरम्यान पथकाने आरोपी क्रं. ०१, ०२ व ०४ यांची दि. १९/१२/२०२३ ते दि. ३०/१२/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेवुन तपास करुन त्यांचेकडुन आजपावेतो रोख रक्कम, सोन्याचे दागिने व अपहार केलेल्या रक्कमेतुन घेतलेली मोटर कार असा एकुण १९,४२,९६०/- रुपये असे हस्तगत केले आहेत. तसेच आरोपी यांनी गुन्हातील अपहार केलेली उर्वरीत रक्कम त्यांचे परीचयाचे काही व्यक्तींना दिलेली असुन त्यांचेकडून सदरची रक्कम गुन्ह्याचे तपासात हस्तगत करीत आहोत. तसेच ज्यांनी अपहार केलेल्या रक्कमेतुन आरोपींकडून पैसे घेतलेले आहेत. अश्या व्यक्तींना सदरची रक्कम पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याचे तपासात जमा करणेबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत. तरी देखील त्यांनी सदरची रक्कम जमा केली नाही तर त्यांना देखील नमुद गुन्ह्यात आरोपी करुन अटक करण्याची तजवीन ठेवली आहे.

नमूद  गुन्ह्याचा पुढील तपास मा. वरीष्ठांच्या मार्गदर्शानाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउपनिरी. सुहास आव्हाह व पोकों १५४१ उज्वलकुमार म्हस्के हे करीत आहेत.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे