एक वर्षापासुन गुन्ह्यातील फरार आरोपी टोळी प्रमुख चाळीसगांव शहर पोलीसांकडुन जेलबंद केले बाबत.

ता.प्रतिनिधी कल्पेश महाले चाळीसगाव
दिनांक १८- ११ – २०२२ रोजी रात्री ०९:०० वाजेच्या सुमारास आण्णा कोळी यांचे घरासमोर, छाजेड ऑईल मिलच्या मागे, चाळीसगाव येथे हैदर अली आसिफ अली, नदीम खान साबिर खान उर्फ गोल्डन, सुलतान शेख रहेमान शेख, वाजिद खान साबिर खान, शेख नवाज शेख सलीम व इतर दोन अनोळखी इसमांनी एकत्रीत येवुन, फिर्यादी वैभव अरुण रोकडे वय २४ वर्ष व साक्षीदार यांनी आरोपींना त्यांना पृथ्वी कुमावत याला मारहाण का केली याबाबत विचारणा केली म्हणुन फिर्यादी व साक्षीदारांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडके व चॉपरने फिर्यादीच्या डोक्यात व साक्षीदाराच्या मांडीवर घाव घालून गंभीर दुखापत केली होती.
वर नमुद प्रकारावरुन चाळीसगांव शहर पो.स्टे.ला दिनांक १९ – ११ – २०२२ रोजी वर नमुद आरोपीतांविरुध्द गुरनं. ४९३/२०२२ भादवि कलम ३०७, ३२३, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०६ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३)चे उल्लघंन १३५ प्रमाणे गुन्हा नोंद असुन गुन्ह्यातील टोळी प्रमुख हैदर अली आसिफ अली हा आज पावेतो फरार होता.
मा. श्री.एम. राजकुमार सो.पोलीस अधिक्षक यांचे तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे व मा.सहा.पोलीस अधिक्षक सो.श्री अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक, संदीप पाटील यांनी एक विशेष पथक तयार केले होते, पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक, सुहास आव्हाड व पोलीस अंमलदार पोना/महेंद्र पाटील, पोना/भुषण पाटील, पोकॉ/विजय पाटील, अमोल भोसले, पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, प्रकाश पाटील, मपोहेकॉ/विमल सानप अशांनी सदर गुन्ह्यातील टोळी प्रमुख हैदर अली आसिफ अली याचा कसुन शोध घेवुन देखील गुन्ह्यातील आरोपी मिळुन येत नव्हता.
आज दिनांक १९ – १२ – २०२३ रोजी पोना/महेंद्र पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, गुन्ह्यातील टोळी प्रमुख आरोपी नामे हैदर अली आसिफ अली हा त्याच्या राहते घरी आलेला असल्याची माहीती मिळाल्याने त्यांनी पोनि/संदीप पाटील यांना कळविल्याने, त्यांनी वर नमुद पथकास आदेशीत करुन, तात्काळ आरोपीताच्या घरी रवाना केले असता दिनांक १८ – ११ – २०२२ रोजी पासुन फरार आरोपी आज रोजी चाळीसगांव शहर पोलीसांच्या ताब्यात आला असुन, पोलीसांनी त्यास अटक केली आहे. नमुद आरोपीताविरुध्द आज पावेतो शरीराविरुध्दचे ११ मालाविरुध्दचा ०१, महिला अत्याराविरुध्दचा ०१ असे एकुण १३ गुन्हे दाखल आहेत तसेच त्यास ०२ वेळा हद्दपार व ०१ वेळा MPDA कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
निव्वळ गुन्ह्याचे तपासात नमुद आरोपीताची पोलीस कस्टडी घेवुन सपोनि/दिपक बिरारी व पोहेकॉ/विनोद भोई, पोकॉ/प्रकाश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.