मेहुंनबारे पोलीसांचे धाडसत्र सुरूच, अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले..

चाळीसगाव तालुका प्रतिनिधी कल्पेश महाले.
चाळीसगाव : मेहूनबारे पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. नव्याने पदभार घेतलेलं मेहूनबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी आपल्या खाकीचा जोर दावत अवैध दारू विक्रेत्यांवर धाडसत्र सुरू केले आहे.
पहिल्याच दिवशी आपल्या गुप्त सूत्र धारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स.पो.नी संदीप परदेशी यांनी सायगाव शिवाराच्या गिराना नदीच्या काठावर असलेल्या दारू भट्टीवर धाड टाकली होती. त्यातील आरोपी किरण भास्कर दळवी हा ४०५०० रू किमतीचे कच्चे पक्के नवसागर गूळ युक्त रसायन व दारू सह पकडला गेला यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्या धाड सत्राला काही तास उलटत नाही तोवर गुप्त सूत्राच्या मिळालेल्या माहिती नुसार दरेगाव लोंढे येथील अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या एका हॉटेल व्यावसायिकावर धाड टाकून कारवाई करण्यात आली. त्यावर सुद्धा राज्य उत्पादन शुल्क चाळीसगाव येथे गुन्हा दखल करण्यात आला आहे.
त्यातच अजून मिळालेल्या माहिती निसार रहीपुरी शिवारातील एका हातभट्टी गावठी दारू अड्डा वर धाड टाकण्यात आली. त्यात रहिपुरी येथील सागर बाबुलाल मोरे हा २७७५० रू किमतीचे कच्चे पक्के रसायांसह पकडला गेला. त्यावर सुद्धा दारूबंदी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करतात आला आहे.
हप्ते देऊन आम्ही दारूचा अड्डा चालवतो, पोलीस ही आमच्या दारूच्या अड्या पर्यंत येऊ शकत नाही. असे म्हणणारे सुद्धा स.पो.नी संदीप परदेशी यांच्या कारवाईचा धाक घेत आहे. त्यामुळे महिला वर्गात स.पो.नी संदीप परदेशी यांची वाहवा केली जात आहे. असेच धाडसत्र कायम सुरू ठेवावे असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
स.पो.नी संदीप परदेशी यांनी सुरू केलेल्या धाडसत्राने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, खाकीचा धाक अवैध दारू विक्रेत्यांना किती दिवस राहील ? हे धाडसत्र कायम सुरू राहील का ? असा प्रश्न सुद्धा सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.