ग्रामपंचायत मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी न केल्याने वंचीत बहुजन आघाडी कडून कडक कारवाईची मागणी.

ग्रामपंचायत मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी न केल्याने वंचीत बहुजन आघाडी कडून कडक कारवाईची मागणी.
चाळीसगाव तालुका प्रतिनिधी
चाळीसगाव : प्रतेक ग्रामपंचायतीमध्ये महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी करावी. असा महाराष्ट्र शासनाने आदेश पारित केला असला तरी त्याची पायमल्ली व महापुरुषांची विटंबना वेळोवेळी होतांना दिसत आहे. तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायत मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी केली गेली नाही. ही तर एक प्रकारे बाबासाहेबांची विटंबना च आहे. याची चौकशी करून कडक कारवाईची मागणी वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विलास चव्हाण यांनी केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, बाहाळ व खडकी बु ग्रामपंचायत मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुण्यतिथी साजरी केली गेली नाही. एवढेच नाही तर नुसते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन सुद्धा करण्यात आले नाही. याच दोन ग्रामपंचायत मध्येच नाही तर अनेक गावांमधील ग्रामपंचायत मध्ये डॉ.बाबासाहेबांची पुण्यतिथी साजरी केली गेली नसल्याचे वंचीत बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष विलास चव्हाण यांचे चौकशी करून कारवाई ची मागणी केली आहे.
प्रतेक ग्रामपंचायत मध्ये जयंती साजरी करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत. त्याच प्रमाणे पुण्यतिथी सुध्धा साजरी केली जाते. ग्रामपंचायत मध्ये प्रतिमा पूजन केले जाते त्यांच्या विषयी ग्रामसेवक असेल किंवा सरपंच, प्रतिष्ठित व्यक्ती हे माहिती देतात, त्यांचा कार्यक्रमाची माहिती फोटो सहित ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्या कडे असणे आवश्यक आहे. असे जर होत नसेल तर ही तर महापुरुषांची विटंबना आहे. आज बाबासाहेब आहे, उद्या अजून कोणत्याही महापुरुषांची विटंबना होऊ शकते, यासाठी सखोल चौकशी करून कारवाई करावी. अन्यथा वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचीत बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष विलास चव्हाण यांनी दिला आहे.
याच आशयाचे निवेदन दिनांक ७ डिसेंबर रोजी चाळीसगाव तहसीलदार, उपविभागीय अधिकारी साहेब व पंचायत समितीला देण्यात आले.