आक्षेपार्ह व असभ्य कृत्य करण्यास जागा उपलब्ध करुन देणाऱ्यावर चाळीसगांव पोलीसांची कारवाई.

ता.प्रतिनिधी कल्पेश महाले.
आज दिनांक २६ डिसेंबर रोजी ३:०० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील यांना चाळीसगाव शहरातील हिरापुर रोड कडील, रा.वी. कॉलेजच्या गेट समोरील, नगर पालीका कॉम्पलेक्स येथे एक इसम उमाकांत दिलीप अहिरराव हा त्याच्या यु.एस कॅफेमध्ये परीसरातील शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी व विद्यार्थीनी, तरुण- तरुणीना कॉफी, चहा देण्याच्या निमित्ताने त्याच्या कँफेमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देवुन, त्या ठिकाणी त्यांना अक्षेपार्ह व असभ्य कृत्य करण्यास परवानगी देतो, त्या बदल्यात त्यांच्या कडुन पैसे स्विकार असल्याची माहिती मिळाली. तसेच सदर प्रकारामुळे आजुबाजुच्या परीसरातील दुकानदार, ग्राहक व इतर लोकांना त्रास होत असल्याचे कळले
त्यावरुन मा. श्री.एम. राजकुमार सो. पोलीस अधिक्षक यांचे तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे पोलीस निरीक्षक, संदीप पाटील यांनी पोहेकॉ/योगेश बेलदार, पंढरीनाथ पवार, पोना/दिपक पाटील, पोकॉ/शरद पाटील, मोहन सुर्यवंशी, अमोल भोसले, गणेश कुंवर, म.पो.शि. सबा शेखअशांना माहीती देवुन, मिळालेल्या बातमीची खात्री करुन, कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याप्रमाणे, यु.एस कॅफेमध्ये एकुण ४ मुले व मुली आक्षेपार्ह वर्तन करतांना मिळुन आल्याने त्यांना असे कृत्य न करण्याची समज देवुन सोडुन देण्यात आले.
सदर कॅफेमधील इसम नामे उमाकांत दिलीप अहिरराव व योगराज कैलास गुंजाळ दोन्ही रा. जाहगीरदार वाडी, चाळीसगाव असे दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशी अंती कॅफे मालकाविरुध्द विरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे. ला भादवि कलम २९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्ह्यात मा.न्यायालयाची परवानगी घेवुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि/विशाल टकले हे करणार आहेत.
सदर कारवाईच्या वेळी घटनेचे गांभीर्य लक्षात येताच मा. आमदार श्री मंगेश चव्हाण यांनी देखील सदर ठिकाणी भेट देऊन नगरपालिका प्रशासनास कार्यवाही कामी सूचना दिल्या …पोलीसांनी यापुर्वी देखील सदर कॅफेवर कारवाई केलेली असल्यामुळे तसेच सदरचे कॅफे हे अनधिकृत असल्याने त्याच्यावर कारवाई करणेकामी न.प. चाळीसगांव प्रशासनास कळविल्याप्रमाणे न. प. चाळीसगांव यांनी पोलीसांच्या कारवाई नंतर सदरचे अनधिकृत कॅफेविरुध्द कारवाई केली आहे. तरी चाळीसगांव तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, चाळीसगांव शहर येथे शिक्षणासाठी येणाऱ्या त्यांच्या मुलांबाबत सतर्क राहुन, आपली मुले व मुली काय करतात याबाबत काळजी घ्यावी तसेच अशा प्रकारचे कॅफे अगर लॉजेस कोणी गैरकृत्यासाठी उपलब्ध करुन देत असल्यास चाळीसगांव शहर पो.स्टे. कळवावे. खबर देणाऱ्या इसमाचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.