बोदर्डे येथील भाविकांनी नवरात्रप्रारंभी माहूरगड येथून पायी चालत आणली ज्योत.

(प्रतिनिधी – विलास पाटील)
भडगाव:- तालुक्यातील बोदर्डे येथील तरुणांनी चारशे किलोमीटर अंतरावरुन श्री.क्षेत्र माहूरगड ते बोदर्डे पायी चालत नवरात्र उत्सवासाठी ज्योत आणली आहे. बोदर्डे येथून दरवर्षी दुर्गादेवी मित्र मंडळाचे भाविक हे सप्तशृंगी गड, पावागड तसेच अन्य ठिकाणाहून पायी चालत ज्योत घेऊन दुर्गा उत्सव साजरा करतात. यावर्षी श्रीक्षेत्र माहूरगड येथून भक्ती भावाने देवीचा जयघोष करून तरुणांनी पायात पादत्राणे न घालता देवीची ज्योत आणली श्रीक्षेत्र माहूरगड येथून ज्योत घेऊन येणाऱ्या गावातील दुर्गादेवी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचे ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी गोपाल पाटील, राकेश पाटील, हरी पाटील, शुभम पाटील, कमलेश पाटोळे, योगेश भिल्ल, आकाश पाटील, अविनाश पाटील, प्रवीण पाटील, दादू पाटील, धीरज भिल्ल, शुभम पाटील, निलेश पाटील, योगेश पाटील, नारायण भिल्ल, बंटी पाटील, बारकू पाटील, सुमीत पाटील उपस्थित होते.
आश्विन शु. प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे आज ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी गुरुवारी नवरात्रारंभ / घटस्थापना होणार असून यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांची आहे. दिनांक ७ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी असून दिनांक १० ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. दिनांक ११ रोजी महाष्टमीचा व नवमी उपवास एकाच दिवशी असून दिनांक १२ ऑक्टोबर रोजी शनिवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ति) आणि दसरा आहे.