चतुर्भुज तांडा येथील ३२ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यु..

चतुर्भुज तांडा येथील ३२ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यु..
प्रतिनिधी लखन गरूड
चाळीसगाव तालुक्यातील शिंदी चतुर्भुज तांडा येथील ३२ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यु झाला. मृत्य झालेल्या तरुणाचे नाव गोरख गांधी राठोड असे आहे.
गोरख राठोड यांची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची आहे. घरी शेती नसल्याने हातमजुरी करून आपल्या परिवाराची पोटाची खळगी गोरख हा भागवत होता. दिनांक ८ जून रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान शेतामध्ये सरपंण काढण्यासाठी गेला होता. त्या दरम्यान सरपंण काढत असताना एका विषारी सर्पाने गोरखला दंश केला.
हे गोरख राठोड याला कळताच त्याने गावाकडे धाव घेतली. परंतु सर्पदंश झाल्यापासून गावाचे अंतर हे किमान २ की.मी असल्याने गोरख ला गावात पोहचण्यासाठी थोडा वेळच लागला. गावात गोरख पोहचल्यावर त्याने गावातील ४/५ नागरिकांना सर्पदंश झाल्याचे सांगितले. ही बाब गावातील समाजसेवक भाऊसाहेब नवले यांना माहीत पडताच यांनी स्वतःच्या गाडीत गोरखला घेऊन चाळिसगाव येथील सरकारी हॉस्पिटल ला घेऊन गेले. परंतु सर्पदंश होऊन खूप उशीर झाल्याने गोरख ची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यामुळे गोराखला चाळीसगाव येथील बापजी हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान देशमुख डॉक्टर यांनी गोरखला सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान मृत घोषित केले.
गोरखच्या मृत्युने संपूर्ण शिंदी चतुर्भुज तांडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत गोरख च्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे.