शिवजयंतीनिमित्त चाळीसगांव येथे विविध क्षेत्रात यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा रयत सेनेच्या वतीने गौरव…

तरुणांनो ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्राचे सोन करा – युवा व्याखाते प्रा चंद्रकांत ठाकरे..
शिवजयंतीनिमित्त चाळीसगांव येथे विविध क्षेत्रात यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा रयत सेनेच्या वतीने गौरव…
प्रतिनिधी कल्पेश महाले (चाळिसगाव)
चाळीसगाव – छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलीही जात न बघता मावळ्यांमध्ये निष्ठा बघून सैन्यात स्थान दिल्यामुळेच स्वराज्य निर्माण झाले. महाराज युध्दाचे काटेकोरपणे नियोजन करून लढाईची मोहीम आखत असे त्यामुळेच लढाईत विजयीश्री प्राप्त होऊन कुठलीही मनुष्यहानी न होता जाज्वल्य असा इतिहास शिवरायांनी निर्माण केला आहे. शिवचत्रीतातुन आजच्या तरुणांनी प्रेरणा घेऊन आयुष्यात मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन युवा व्याखाते प्रा.चंद्रकांत ठाकरे यांनी शहरातील पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात दि १९ रोजी शिवजयंती निमित्त रयत सेना आयोजित कार्यक्रमा प्रसंगी केले.
यावेळी विविध क्षेत्रात यश प्राप्त करणारे विद्यार्थी तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजधुरीणांचा रयत सेनेच्या वतीने सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. प्रा चंद्रकांत ठाकरे व्याख्यानातून पुढे बोलताना म्हणाले की, पुणे शहर उध्वस्त झालेले शहर होते. तेथे जाऊन राष्ट्रमाता जिजाऊ यांनी रयतेला साद घालत आणि त्यांनी घातलेल्या सादेला प्रतिसाद देत रयत पुन्हा पुणे येथे आली रयते समोर जमिनीत गाडलेली पहार बाल शिवबाना उपसून टाकून अंधश्रद्धेला नाकारत बंजर झालेल्या जमिनीवर सोन्याचा फाळ असलेल्या नागराने नागरली आणि तेथून पुण्यात रयत सुखावली असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजानी स्वराज्यात रयतेस न्याय देत अन्याय करनाऱ्याना कडक शासन करत माहिला व रयतेचे संरक्षण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेचे माजी सभापती पोपट भोळे होते. प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तद्दनंतर मान्यवरांचा सत्कार रयत सेनेच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकातुन रयत सेना चे संस्थापक गणेश पवार म्हणाले की रयत सेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समस्या सोडविण्याचे काम करत शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिलांच्या न्यायासाठी लढा उभारत न्याय देण्याचे काम केले समाजाचे काही देणे लागतो म्हणून रयत सेनेच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी शालेय साहित्य वाटप करत महिलांचे आरोग्य शिबिरे घेत त्यांच्या मोफत सर्व अत्यावश्यक वैद्यकीय चाचण्या करून आरोग्याचे हित साधण्याचे कार्य केले. कामगारांनी केलेल्या कामाचा मोबदला मिळत नव्हता तेथे देखील कामगारांसाठी लढा उभारल्याने कामगारांना पगार मिळवून दिला असे अनेक कार्य रयत सेनेच्या माध्यमातून करत असल्याचे सांगितले, टाकळी प्र.चा. उपसरपंच तथा ज्येष्ठ पत्रकार किसनरावजी जोर्वेकर म्हणाले की श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलाही जातीभेद न करता अठरापगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेत स्वराज्य निर्माण केले. त्यांचे विचार समाजाने आत्मसात केले पाहिजे तेव्हाच चांगला समाज घडणार असल्याचे सांगितले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हा परीषदेचे मा सभापती पोपट भोळे बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेवून रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार व रयत सेनेचे कार्यकर्ते समाजात कौतुकास्पद काम करत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत असल्याचे सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनावर तनिष्का पवार,खुशी पवार, नेहारीका पवार यांनी विचार प्रकट केले तर प्रिंप्री बु प्र चा लोकनियुक्त सरपंचपदी राजुभाऊ मोरे निवडून आले त्यांचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रात यश प्राप्त विद्यार्थी तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजधुरीणांचा रयत सेनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मा. जि प सदस्य शशिकांत साळुंखे, रा.वि. संचालक प्रमोद पाटील,एस पी ठाकरे,प्रा गौतम निकम, प.स.उपसभापती संजय पाटील, शेतकी संघ संचालक किशोर पाटील, मा नगरसेवक सुरेश चौधरी, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, चंद्रकांत तायडे, मुस्लिम समाजाचे अल्लाउद्दीन शेख, ॲड राहुल जाधव, हिरकणी मंडळच्या अध्यक्षा सुचित्रा राजपूत, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, मा.सैनिक आबासाहेब गरुड, मराठा सेवा संघ शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड, शेकाप चे गोकुळ पाटील, प्रा.तुषार निकम उपस्थित होते तर मराठा समाजाचे राजेंद्र पाटील, तमाल देशमुख, मुकुंद पाटील, राजेंद्र शिंदे तसेच अभय वाघ, योगेश पाटील,सतीश पवार, रमेश नवले, बाळु पवार, भिकन पवार, दिलीप पवार, योगेश गव्हाणे,बबन पवार, रमेश पवार, बाजीराव गुजर, रामा पवार, ॲड आकाश पोळ, दीपक पाटील, आर बी जगताप, जी जी वाघ, अशोक भोसले, बंडु पगार, दीपक पवार महाराज, अमोल पवार, अजय माने यांच्यासह रयत सेनेचे पी एन पाटील, ज्ञानेश्वर कोल्हे, प्रमोद वाघ, दीपक देशमुख, प्रदीप मराठे, छोटू अहिरे, मुकुंद पवार,भरत नवले, ज्ञानेश्वर सोनार, दिनेश चव्हाण, विकास पवार, सतीश पवार, दत्तू पवार, शिवाजी गवळी, धनंजय मराठे, विलास मराठे, श्रीकांत तांबे, सचिन पवार, अशोक पवार, प्रकाश गवळी, प्रशांत अजबे, भूषण बिरारी ,राजू मामा पाटील, विलास पाटील, अमोल पगारे अभिजीत शिंदे, रवींद्र शिनकर, गंगाराम जाट, भगवान गजरे, शिवाजी औरंगे, दिलीप हापसे, भावडू नामदे, राज पाटील, अनिल रावते, कृष्णा मराठे उपस्थित तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी छोटु अहिरे, संजय हिरेकर, गणेश सुनील पवार, दत्तु पवार, संतोष पाटील, अमोल पाटील, मंगेश देठे, प्रवीण पवार यांनी परीश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन नागमोती तर आभार प्रदर्शन दिनेश चव्हाण यांनी मानले.