एकलव्य स्वाभिमान संघटनेचा आ.मंगेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा – दिनकर मोरे

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – मतदानाची तारीख जवळ येत असतानाच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आ.मंगेश चव्हाण यांनी यांना पाठिंबा देण्यासाठी आणि भाजपा पक्षप्रवेश करणार्यांची अक्षरशः रीघ लागली असून आजदेखील एकलव्य स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व अपक्ष उमेदवार दिनकर मोरे यांनी आपल्या संघटनेच्या वतीने आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विकासात्मक नेतृवावर विश्वास ठेवून जाहीर पाठिंबा दिला आहे.
संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिले पाठिंबा पत्र
एकलव्य स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिनकर मोरे यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजबांधवांना आवाहन केले आहे की चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांचा एकुणच विकास कामांचा झंझावात पाहता तसेच कुठलाही भेदभाव न करता सर्वसमावेशक विविध सामाजिक व जाती धर्मासाठी त्यांनी केलेली विकासकामे पाहता त्यांना एकलव्य स्वाभिमान संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांच्या व्यतिरिक्त आमचा कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला किंवा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही याची नोंद घ्यावी. तरी एकलव्य स्वाभिमान संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव यांनी येत्या २० तारखेला अनुक्रमांक २ समोरील कमळ चिन्हापुढील बटन दाबून भाजपा उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्यावे असे देखील जाहीर आवाहन दिनकर मोरे यांनी केले आहे.