कासोदा येथे हजरत सादिक शाहा बाबा उर्स निमित्ताने कव्वालीचा कार्यक्रमाचे आयोजन.

कासोदा येथे हजरत सादिक शाहा बाबा उर्स निमित्ताने कव्वालीचा कार्यक्रमाचे आयोजन.
कासोदा प्रतिनिधी इमरान शेख
कासोदा येथील हजरत सादिक शाहा बाबा यांच्या दर्ग्यावरील उरूस मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. उरूस निमित्ताने संदल ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजरत सादिक शाहा बाबा यांच्या उरूस निमित्ताने मुस्लिम पंच कमिटी च्या वतीने दरवर्षी कव्वाली चा कार्यक्रम आयोजित केलेला असतो.
सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक २५ जुलै रोजी सुप्रसिद्ध टीव्ही सिंगर अतिश मुरात खाजा यांचा कव्वाली चा कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे.
ठराविक वेळ पेक्षा २ तास जास्त वेळ मिळावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजक मुस्लिम पंच कमिटी उर्स कमिटी आयोजक उर्स कमिटी अध्यक्ष सय्यद अफसर अली, उपाध्यक्ष जुबेद अली माजी उपसरपंच मुक्तार सर, माजी उपसरपंच समद कुरेशी, माजी उप सरपंच आबित, समाजसेवक अल्ताफ अली भावी ग्रामपंचायत सदस्य इस्तक अली, समाजसेवक आरिफ अली, समाजसेवक बशीर शेख, समाजसेवक इकबाल पठाण सर्व उर्स कमिटी सदस्य कासोदा यांच्यातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले.