एकलव्य अकॅडमीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय जनरल नॉलेज स्पर्धेत ब.ज.हिरण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यश.

एकलव्य अकॅडमीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय जनरल नॉलेज स्पर्धेत ब.ज.हिरण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यश.
प्रतिनिधी संजय महाजन.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंवर्धनाकरिता एकलव्य अकॅडमीच्या वतीने राज्यस्तरीय जनरल नॉलेज स्पर्धेचे बबनबाई जवरीलाल हीरण माध्यमिक विद्यालय कजगांव येथे आयोजन करण्यात आले होते. त्यात बबनबाई जवरीलाल हीरण माध्यमिक विद्यालय कजगांव येथील विद्यार्थिनीने १८८ गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेसाठी ५ वी तें ७ वी या वर्गातून ७१ विद्यार्थी तर ८ वी तें १० वी या वर्गातून ९८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या परीक्षेत ब .ज .हिरण विद्यालयातून खुशी गोविंद बेलदार १८८ गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला तर जाहीद अमजद शहा द्वितीय क्रमांक व चैतन्य जसवंतसिंग तिसरा क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर तेजस्विनी अमोल जाधव हीं विद्यार्थी उत्तेजनार्थ उत्तीर्ण झाली आहे .सर्व सहभागी विद्यार्थांचे व गुणवत्ता धारक विद्यार्थांचे विद्यालयामार्फत मुख्याध्यापक एम .के .पवार, पर्यवेक्षक जी.टी .पाटिल व मार्गदर्शक शिक्षक यांच्यामार्फत व संस्थामार्फत चेअरमन मंगेश सुमेरसिंग पाटिल, सचिव रत्नाताई भरतसिंग पाटिल व संचालक मंडळ मार्फत अभिनंदन करण्यात येत आहे.