चाळीसगांव जवळील कन्नड घाटाच्या पायथ्याशी पिकअप गाडीचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर नऊ जण गंभीर जखमी.

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – काल दिनांक २ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता देवदर्शनाहून परतताना चाळीसगाव कन्नड घाटाच्या पायथ्याला चालकाचा मालवाहतूक पिकअप गाडी क्र. एम.एच.१९ बी.एम.३९४७ या वाहनावरील ताबा सुटून कठड्याला जोरदार धडकली असता ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या व महामार्ग पोलीसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
झालेल्या अपघातामध्ये सातरबाई मधुकर माळी, पातोंडा वय -६५, नाना दामू माळी, पातोंडा, राहुल लक्ष्मण महाजन, गुढे हे मयत झाले असून राजेंद्र भीमराव माळी, वय ४२, रा.गुढे, अनिकेत रमेश माळी वय १७, रा.पातोंडा, गौरव धर्मा माळी वय १७, रा.पातोंडा सुनीता रमेश माळी, वय ३८, रा.पातोंडा, संदीप संपत माळी, रा.हरचंद पहाण, निंबा काळू महाजन वय ६५, रा.पोहरे, भीमराव भगवान महाजन, वय ३०, रा.पातोंडा, नाना संतोष माळी, वय ३२, रा.पातोंडा, गोपीचंद निंबा महाजन, चालक, रा. पातोंडा हे नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
काही गंभीर जखमींना शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर इतर जखमींवर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात डॉ. मंदार करंबेळकर यांनी तातडीने उपचार केले. या अपघातानंतर चाळीसगाव महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील, हवालदार बापु पाटील, हवालदार शांताराम थोरात, हवालदार जितेंद्र माळी, हवालदार सुशील पाटील, पो.कॉ.दिपक जगताप, हवालदार बापु पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल करणेकामी मदतकार्य केले.