वयोवृद्ध इसमांना रिक्षात बसवून त्यांना लुटनारी टोळी जेरबंद.

उपसंपादक – कल्पेश महाले
जळगांव – दि.२९/०३/२०२५ रोजी फिर्यादी शेख फिरोज शेख शाद्दुल्ला, वय ५०, रा. नांदुरा, जि. बुलढाणा हे जळगांव शहरातील एमआयडीसी पोस्टे हद्दीतील अजिंठा चौफुली येथून नांदुरा येथे जाण्यासाठी थांबलेले होते. त्यांचे जवळ एका प्लास्टीकच्या पिशवीत २५००० रुपये रोख होते. त्याठिकाणी एक रिक्षा येऊन थांबली व रिक्षा चालकाने आम्ही खामगाव जात आहोत, तुम्हाला कुठे जायेचे आहे असे विचारुन, फिर्यादी यांनी बसण्यासाठी होकार देताच रिक्षा चालकाने फिर्यादीला मागच्या दोन प्रवासांसोबत सीट वर बसण्यास सांगितले. त्यानंतर थोड्या अंतरावर गेल्यावर मागे बसलेले प्रवासी यांनी फिर्यादीस सांगितले की, आम्हाला सिट वर व्यवस्थीत बसता येत नाही, तुम्ही खाली उतरुन जा व दुस-या गाडीत या. त्यामुळे फिर्यादी हे त्या रिक्षातुन खाली उतरुन फिर्यादी यांनी त्यांचे सोबत असलेली प्लास्टीकची पैशांची पिशवी बघीतली असता, त्या पिशवीला कट मारलेला दिसला व त्यात ठेवलेले पैसे दिसुन आले नाहीत. फिर्यादीने लागलीच रिक्षा थांबवीण्यासाठी जोरात आवाज दिला परंतु रिक्षा न थांबता निघून गेली. त्यानंतर फिर्यादी यांनी एमआयडीसी पोस्टे ला येऊन पैसे चोरी झाले बाबत फिर्याद दाखल केली.
मा.पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी सो यांनी वाढत्या चो-या तसेच गुन्हे यांचेवर आळा बसणे कामी नेत्रम नावाचा प्रोजेक्ट जळगांव शहरासाठी विकसीत केला आहे. सदर प्रोजेक्ट मध्ये शहरातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवून, सर्व कॅमेरे पोलीस अधिक्षक कार्यालयात एक नियंत्रण कक्षात जोडण्यात आलेले आहेत. तरी सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी अपर पोलीस अधिक्षक श्री.अशोक नखाते सो, पोलीस उप अधिक्षक श्री. संदिप गावीत सो., मा.पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी नेत्रम प्रोजेक्ट वरील सीसीटिव्ही चेक करणे कामी सुचना दिल्या होत्या.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोउनि.राहुल तायडे, पोउनि.चंद्रकांत धनके, पोना. प्रदिप चौधरी, पोकॉ. राहुल रगडे, पोकॉ. विशाल कोळी, पोकॉ. रतन गिते, पोकॉ. गणेश ठाकरे अशांनी नेत्रम प्रोजेक्टचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता एक संशयीत रिक्षा मिळून आली. रिक्षा चालक वसीम कय्युम खाटीक, रा.मास्टर कॉलनी जळगांव यास ताब्यात घेऊन त्याचे कडे सखोल विचारपुस केली असता, सदर गुन्हा हा त्याने व त्याचा साथीदार तौसीफ खान सत्तार खान, रा, रामनगर मेहरुण जळगाव व एक अल्पवयीन अशांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. तौसीफ खान हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर जबरी चोरी,चोरी असे तीन गुन्हे दाखल आहेत. तरी सदर आरोपीं बाबत गोपनीय माहिती काढून त्यांना पळून जाण्याची संधी न देता वरील अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या कडून गुन्हयातील फिर्यादी यांची चोरलेली २५ हजार रुपये रक्कम व गुन्हात वापरलेली बजाज कंपनीची रिक्षा क्रमांक MH१९-CW-५२५० हि जप्त करण्यात आली आहे.
सदरचा गुन्हा नेत्रम प्रोजेक्ट द्वारे बसविण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमुळे एमआयडीसीचे वरील अधिकारी व कर्मचारी यांनी उघडकीस आणलेला आहे. तरी जळगांव शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, जळगांव शहर अधिक सुरक्षीत करण्यासाठी आपल्या परिसरात लोक सहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नेत्रम प्रोजेक्टला जोडण्यासाठी मदत करावी.