चाळीसगाव तालुक्यातील सायगाव गावात चोरीची वाळू भरताना जेसीबी व डंपर पकडले.

ता.प्रतिनिधी कल्पेश महाले.
चाळीसगाव प्रांताधिकारी साहेब चाळीसगाव तहसिलदार साहेब,अप्पर तहसिलदार साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव अभयसिंह देशमुख साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली असता सायगाव गावी डोंगर भागात आडोशाला बैलगाड्यांद्वारे वाळूचा थप्पा मारून एक जेसीबी व एक डंपर अवैधरित्या वाळू भरण्यासाठी येत आहे. बाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशान्वये मेहूनबारे पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी सर फौजदार मिलिंद शिंदे,पोलीस कॉन्स्टेबल गोरख चकोर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश लोहार, पोलीस कॉन्स्टेबल जितु परदेशी, सोबत महसूल विभागातील तलाठी प्रकाश झाडे, तलाठी सचिन हातोळे, राहुल अल्हात, गणेश गढरी, पवन शेलार घनश्याम बागुल, कोतवाल सागर पाटील असे पथकासह रवांना झाले.
गोपनीय माहिती आधारे सायगाव गावी जाऊन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी महसूल पथकासह डंपरमध्ये जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू भरताना मिळून आले. त्यांच्याजवळ कोणताही परवाना नसल्याने सदर डंपर व जेसीबी असे मेहुनबारे पोलीस स्टेशन आवारात जमा करून सदर वाहनांवरती वरिष्ठ महसूल अधिकारी यांच्या आदेशान्वये दंडात्मक कारवाईकामी जमा करून रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे.