संपत्ती बरोबरच मुलांसाठी संस्कार देखील गरजेचे: ह.भ.प. इंदुरीकर महाराज.

(कार्यकारी संपादक – संजय महाजन)
कजगाव:- आई वडिलांनी संपत्ती बरोबरच आपल्या मुलांना संस्कार देखील देणे गरजेचे आहे आणि तेच संस्कार भविष्यात आपल्या जीवनात उपयोगात पडतील असे प्रतिपादन महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कजगाव तेथें किर्तन प्रसंगी केले पुढे निवृत्ती महाराज म्हणाले की आयुष्यात आपली मुले ही आपल्याला कशी वागणुक देत आहेत याचे उदाहरण आज आपण पाहत आहोत त्यामुळे संपत्ती कमावण्याच्या नादात आपल्या मुलांच्या संस्काराकडे दुर्लक्ष होऊ देवून नका कारण दिलेले संस्कार हे कायम असतात तर मुलांसाठी कमावलेली संपत्ती त्याचं मुलांपैकी कितीतरी टक्के मुले पित्याने कमावलेली संपत्ती सांभाळण्यात अपयशी ठरले आहेत असेही इंदुरीकर महाराज म्हणाले.
कजगाव येथील ज्येष्ठ नागरिक सखाराम रामचंद्र महाजन यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने ब. ज. हिरण विद्यालयाचा प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमात निवृत्ती महाराजांनी भाविकांना कीर्तनातून जीवनातील विविध घडामोडी बाबत नेहमीप्रमाणे स्पष्ट शब्दात मार्गदर्शन केले तसेच मार्गदर्शन करतांना त्यांनी सध्याच्या संपत्ती वादावर थेट भाष्य करतांना सांगितले की न्यायालयात असंख्य केसेस ह्या संपत्ती संदर्भात दाखल आहेत त्यामुळे आजच आपल्या पित्याने व कुटुंब प्रमुखांनी जमिनीच्या वाटणी आपल्या डोळ्यादेखत करून घ्याव्यात म्हणजे भविष्यात वाटणी संदर्भातील वाद वाढणार नाही असे सांगताना त्यांनी सध्याच्या घडीला चालू असलेल्या घटनेवर सविस्तर भाष्य करून मोलाचं सल्ला भाविकांना दिला यावेळी कार्यक्रमासाठी कजगाव परिसरातील शेकडोंच्या संख्येने भाविकांनी किर्तन श्रवनाचा लाभ घेतला.