गायक गुरूनाम मान व संगीतकार डायमंड यांच्यावर शनिमहाराजांचा अवमान केल्याबाबत गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्र्याकडे रयत सेनेची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी – कल्पेश महाले
पंजाब चे गायक गुरूनाम मान व संगीतकार डायमंड यांनी लिविक्स प्रीता के गाणे कोण हे प्रभू शनिदेव यावर गुरूनाम मान यांनी गायलेल्या गाण्यात जाणूनबुजून शनिमहाराजांचा अवमान करून शनिभक्तांच्या धार्मिक श्रध्देला ठेच पोहचविली असल्याने गायक गुरूनाम मान व संगीतकार डायमंड यांच्यावर शनि महाराजांचा अवमान करून भाविकांच्या भावना दुखावल्या बद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री द्वारा पोलिस निरीक्षक चाळीसगाव यांना रयत सेनेच्या वतीने दि २५ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लिविक्स प्रीता के गाणे कोण हे प्रभू शनिदेव हे गाणे म्हणताना गायक गुरुनाम मान तसेच या गाण्याला संगित देणारे डायमंड यांनी तमाम शनि भक्तांच्या धार्मिक भावना व अवमान केल्यामुळे देशातील व राज्यातील लाखो शनिभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. शानि महाराज यांच्यावर शनिभक्तांची नित्यात श्रद्धा असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री यांनी शनिमहाराजांचा अवमान व विटंबना केल्याप्रकरणी पंजाब चे गायक गुरूनाम मान व संगीतकार डायमंड यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी ८ दिवसात गुन्हा दाखल करावा असे न झाल्यास चाळीसगाव सह महाराष्ट्रात रयत सेना राज्यभर आंदोलन करून राज्य सरकारला शनिभक्त जाब विचारतील याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास राज्य सरकार जबाबदार राहणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री द्वारा सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांना रयत सेनेच्या वतीने दि २५ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रत राज्याचे गृहमंत्री म. रा. मुंबई, तहसीलदार चाळीसगाव, आमदार चाळीसगाव, खासदार जळगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर दीपक पवार, जिल्हा अध्यक्ष समता सैनिक दलाचे स्वप्नील जाधव तर रयत सेनेचे अनिल महाले, मयूर पाटील, महेंद्र पाटील, शहीद पिंजारी, महादू कोल्हे, लतीफ ,रवी पाटील, दिनेश पाटील, किशोर पाटील, रोशन अल्हाट, मुन्ना शेरखाने, आकाश जाधव, पंडित नाईक, सागर होनमाने, आशुतोष सोनवणे, बच्चे दादा, विशाल राजपूत, बाळा पगारे, चेतन पाटील, केतन झाल्टे, प्रदीप मोरे, सुरज पवार, धर्मेश पाटील, श्याम ठाकूर, कुणाल कवडे, दीपक गिरणारे, चेतन पाटील, रवी गायकवाड, छोटू पाटील, कृष्णा राठोड, शुभम नवले, अजय राजपूत, सुनील महाले, निलेश परदेशी, बबलू चौधरी,अमोल चौधरी, सोमा चौधरी, देवा जोशी, कपिल राजपूत, समाधान पाटील, आबा महाजन, शरद पाटील, प्रदीप मोरे, सागर पवार, सुरेश भालेराव, राजू शर्मा, सुरेश काटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.