केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथजी शिंदे यांच्या 75 वा वाढदिवसानिमित्त चाळीसगांव येथे रक्तदान शिबीर संपन्न

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – दि.२४ जानेवारी रोजी अरिहंत मंगल कार्यालय येथे केमिस्ट हृदयसम्राट जगन्नाथजी शिंदे यांच्या 75 वा वाढदिवसानिमित्त चाळीसगाव तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन व जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवनेरी फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ.प्रतिभा चव्हाण आणि हिरकणी महिला मंडळ च्या अध्यक्षा सुचित्रा पाटील उपस्थित होते.
प्रथम रक्तदान सय्यम जैन व रविंद्र शिरुडे यांनी केले यावेळी चाळीसगाव तालुका अध्यक्ष योगेश भोकरे, उपाध्यक्ष विनोद जैन, खजिनदार महेश येवले, सहसचिव एकनाथ पाटील, कार्यकारिणी सदस्य महेश कुमट, मंगेश महाजन, योगेश येवले, प्रशांत मालू, संजय ब्राह्मणकर, झोन खजिनदार प्रदिप देशमुख , डॉ.संजय माळी, धनंजय पाटील, वसंत चव्हाण, मोतीलाल दुगड, दिनकर महाजन, हितेश बागरेचा, विलास पाटील, अक्षय देव, जगदिश पाटील, नितेश सुरणा, चंद्रकांत देशमुख, निलेश राजपूत, उमेश पवार, सुनील भामरे, स्वप्नील येवले, तुषार अमृतकर, चेतन पाखले, भागचंद नौलखा, हर्षल पाटील, खुशाल चव्हाण, ज्ञानेश्वर महाले, शिरिष देशमुख, अनिल जाधव, मिलींद ब्राह्मणकार, नामदेव पाटील, हरीश शिनकर, रवी कोठावदे, चंद्रकांत ब्रम्हेचा यांच्यासह बहुसंख्य केमिस्ट बांधव उपस्थीत होते. आजच्या या रक्तदानाच्या महान कार्यक्रमात विक्रमी १५५ बाटल्यांचे संकलन झाले.