कजगाव येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहनांची तपासणी सुरू
कार्यकारी संपादक – संजय महाजन
कजगाव – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग, महसूल व पोलीस प्रशासन सह प्रशासनातील सर्वच विभागांनी कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात कामाला लागली असून त्याचं निमित्ताने कजगाव येथे देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहनांची तपासणी सुरू आहे.
कजगाव हे मराठवाडा आणि खानदेशातला जोडणारा परिसर असल्याने येथून मराठवाडा हद्द असलेल्या नागद अवघ्या पंधरा किमी वर तर जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा ह्या तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शेकडो वाहनांची रहदारी सुरू असते त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरक्षेच्या व कर्तव्ये च्या दृष्टीने वाहने तपासणी सुरू आहेत कजगाव येथे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम पाटील, सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे,पोलीस नाईक नरेंद्र विसपुते हे तपासणी पथक उपस्थित होते.