
संपादक – राजेंद्र न्हावी
जळगाव – राजकारण म्हटल की, सर्व साम – दाम – दंड – भेद बघायला मिळतात. कुठ जवळचाच मित्र, भाऊ विरोधात तर कधी विरोधी च जवळचा बनत असतो. त्यामुळेच राजकारणात काहीही शक्य आहे. असे आपण अनेक नेत्यांना बोलताना पाहिले आणि अनुभवले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जे आमदार एकमेकाच्या विरोधात उमेदवार होते ते आज एकाच व्यासपीठावर एकाच उमेदवार साठी प्रचार करताना दिसत आहे. आणि एकच व्यासपीठावर एकाच उमेदवार साठी प्रचार करत होते ते आज मात्र एकमेकांच्या विरोधात उमेदवारी करत असतानाचे चित्र जळगाव जिल्ह्यातील मतदार संघात दिसत आहे.
आ.गिरीश महाजन – मा. दिलीप खोडपे – मा.संजय गरूड (जामनेर मतदार संघ)
गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदार संघात भाजप चे आ.गिरीश भाऊ महाजन व राष्ट्रवादी चे मां.संजय गरूड यांच्यात एकमेका विरुद्ध २००४, २००९, २०१९ या वर्षी लढत झाली. त्यावेळी आ. गिरीश महाजन यांच्या सोबत मा.दिलीप खोडपे हे होते. तर आज २०२४ च्या निवडणुकीत आ. गिरीश भाऊंच्या सोबत असणारे त्यांच्यासाठी प्रचार करणारे मा.दिलीप खोडपे हे विरोधात आहे. त्यांनी मा.शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षांच्या वतीने तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी अर्ज केला आहे. तर २००४, २००९, २०१९ या वर्षी विरोधात असणारे मा.संजय गरूड यांनी काही महिन्या अगोदर भाजप मध्ये प्रवेश केल्याने विरोधी असलेले मा.संजय गरूड हे आ.गिरीश भाऊ यांच्या सोबत प्रचार करताना दिसत आहे.
आ.किशोर पाटील – श्रीमती.वैशालीताई सुर्यवंशी (भडगाव – पाचोरा विधानसभा मतदार संघ)
गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाचोरा मतदार संघात शिवसेना पक्षाचे आ. किशोर पाटील यांच्या साठी श्रीमती. वैशालीताई सुर्यवंशी यांनी एकत्र येऊन काम केले होते. मात्र यावेळी निवडणुकीत श्रीमती.वैशालीताई सुर्यवंशी यांनी (उ.बा.ठा शिवसेना) या पक्षाकडून उमेदवारी घेतल्याने दोन्ही एकमेकांच्या विरोधात आमने – सामने आले आहे.
आ.मंगेश चव्हाण – खा.उन्मेष पाटील – मा.आ.राजीव देशमुख (चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ)
गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चाळिसगाव मतदार संघात भाजप चे खा.उन्मेष पाटील व राष्ट्रवादीचे मा.आ.राजीव देशमुख यांच्यात एकमेका विरुद्ध लढत झाली होती. त्यावेळी विद्यमान आ.मंगेश चव्हाण हे खा.उन्मेष पाटील यांच्या सोबत होते. तर काही महिन्या अगोदर खा.उन्मेष पाटील यांनी भाजप ला सोडचिठ्ठी देत उ.बा.ठा पक्षाकडून भाजप चे मंगेश चव्हाण यांच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या यावेळी त्यांचे विरोधी असलेले माजी आ.राजीव देशमुख हे मा.शरदचंद्र पवार गटाचे असल्याने दोन्ही ही महाविकास आघाडीचा प्रचार करीत आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उमेदवारी अर्ज करण्यात आले आहे. मात्र यातून माघारी कोणाची होते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.