चाळीसगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई ३,७४,८५५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – राज्य उत्पादन शुल्क, विभागाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहा.आयुक्त पी.पी. सुर्वे (दक्षता अंमलबजावणी), श्रीमती उषा वर्मा विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग, डॉ.व्ही.टी. भूकन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांच्या मार्गदर्शनानुसार व सार्वत्रिक विधानसभा निवडणूक – २०२४ आचारसंहितेच्या अनुषंगाने दि. १५/१०/२०२४ पासून अवैध हातभट्टी निर्मिती, वाहतूक, अवैध ढाब्यांवर मद्यविक्री यांच्यावर दुय्यम निरीक्षक वीट. क्र. १, २ व ३ यांचे सोबत चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जामनेर या तालुक्यात संयुक्त विशेष मोहीम राबवून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार एकूण २० गुन्हे दाखल करण्यात आले असून दारूबंदी गुन्ह्याच्या मुद्देमालासह दुचाकी वाहन असा एकूण किमंत रुपये – ३,७४,८५५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच अवैध मद्य विक्री, वाहतूक यावर दररोज धाडसत्र राबविण्यात येत आहे.
सदर कारवाई करतेवेळी के. एन. गायकवाड निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क चाळीसगाव, डी.एस. पाचपोळे दु.नि. बीट क्र. १, व्ही. जी. पाटील दु.नि. बीट क्र. २, एस. पी. कुटे दु.नि. बीट क्र. ३, बी. डी. बागले सहा. दु. नि., बी. एन. पाटील जवान, ब. न. ०१, गिरीश पाटील जवान, योगेश राठोड जवान यांनी सदर कारवाई केलेली आहे.
तरी जनतेस आवाहन करण्यात येते की, अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री संदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास या विभागाचा टोल फ्री क्र. 18002339999 व व्हॉटसअप क्र. 8422001133 या क्रमांकावर संपर्क साधावा.