राष्ट्रीय हिंदू वाहिनी संगठन जळगाव जिल्हा उपअध्यक्षपदी सतीश पाटील यांची निवड.

राष्ट्रीय हिंदू वाहिनी संगठन जळगाव जिल्हा उपअध्यक्षपदी सतीश पाटील यांची निवड.
उपसंपादक संजय महाजन.
हिंदु समाजाला संघटित करणे, समाजातील धर्म परिवर्तन, गौ हत्या, धर्माची रक्षा यासाठी अनेक संघटना काम करत आहे. त्यापैकी राष्ट्रीय हिंदू वाहिनी संगठन हे जळगाव जिल्ह्यात जलद गतीने प्रसारित होत आहे.
भडगाव येथील रहिवासी दिव्य महाराष्ट्र न्यूज पोर्टल चे उपसंपादक, एम डी टीव्ही न्यूज पोर्टलचे चे भडगाव तालुका प्रतिनिधी मा.सतीश पाटील यांची राष्ट्रीय हिंदू वाहिनी संगठन (उत्तर प्रदेश) यांच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
गेल्या ३ वर्षापासून मां. सतीश पाटील हे राष्ट्रीय हिंदू वाहिनी संगठन यांच्या विचाराशी व संघटनेशी जुळून होते. राष्ट्रीय हिंदू वाहिनी संगठन (उत्तर प्रदेश) चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.रमेश चंद्र द्वीवेदी यांनी सोशल मीडिया द्वारे पत्रक देऊन मां.सतीश पाटील यांची नियुक्ती केली. या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
मा सतीश पाटील यांच्या विषयी….
मा.सतीश पाटील हे एक ज्येष्ठ अनुभवी पत्रकार आहेत, त्यांनी अनेक पोर्टल, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वृत्तवहिनी ला काम केले आहे. आपल्या लेखणी सोबतच प्रखर रोखठोक विचार यावर त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांनी आपल्या पत्रकारीतेची सुरवात १९९९ मध्ये दैनिक गावकरी वृत्तपत्रा पासून केली. त्यानंतर त्यांनी काही दिवस दैनिक देशदूत कृषी सम्राट पाक्षिक साप्ताहिक साथीदार या ठिकाणी कामे केले.
या निवड झाल्याचे त्यांनी सोशल मीडियावर बातमी प्रसारित करताच, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, सत्यकाम न्युज चे मुख्य संपादक राजेंद्र न्हावी, सत्यकाम न्युज चे उपसंपादक कल्पेश महाले, सत्यकाम न्युज चे कार्यकारी संपादक संजय महाजन, दिव्य मराठी न्यूज चे संपादक दादासो मनोहर लेले, शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख नानासाहेब बच्छाव यानी अभिनंदन केले.