७७ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चाळीसगांव येथे ध्वजारोहण समारंभ नुकताच संपन्न

७७ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चाळीसगांव येथे ध्वजारोहण समारंभ नुकताच संपन्न
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – ७७ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चाळीसगांव येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ प्रांताधिकारी श्री.प्रमोद हिले यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी शहर पोलीसांकडून परेड कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री.कुणाल चव्हाण यांच्या पथकाने मानवंदना दिली.
यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार श्री.मंगेश चव्हाण, जील्हाबँक चे संचालक श्री.प्रदीप देशमुख, तहसीलदार श्री.प्रशांत पाटील, अप्पर तहसीलदार श्री.जगदीश भरकर, नायब तहसीलदार श्री.संदेश निकुंभ, नायब तहसीलदार श्री.विकास लाडवंजारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.सौरभ जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री.अनिल बैसाणे, पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.नंदकुमार वाळेकर, तालुका कृषी अधिकारी श्री.संजय चव्हाण,
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संदीप पाटील, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.राहुल पवार, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रदीप एकशिंगे,
पत्रकार श्री.एम.बी.पाटील, श्री.नारायण जेठवाणी, श्री.कल्पेश महाले, श्री.मुराद पटेल, श्री.गफ्फार शेख, खेमचांद कुमावत, ज्येष्ठ नागरिक योगाचार्य वसंत चंद्रात्रे बाबा, श्री.प्रीतमदास रावलानी, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष श्री.आनंद खरात, श्री.सुनिल निकम सर, माजी नगरसेवक श्री.संजय पाटील, श्री.नितीन पाटील, श्री.बापू अहिरे, श्री.प्रभाकर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिल ठाकरे, श्री.बबन पवार,
श्री.सदानंद चौधरी, श्री.विवेक चौधरी आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस पथक, होमगार्ड पथक आणि प्रशासकीय इमारतीमधील सर्व शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समारंभ प्रसंगी शहरातील निर्मला इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर लेझीम नृत्य सादर केले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापिका कविता पाटील, योगिता गोरे, ऋतुजा चव्हाण, सोनाली पवार यांचे लाभले.