चाळीसगाव शहर पोलीसांची जुगार अड्यावर कार्यवाही.

ता.प्रतिनिधी कल्पेश महाले.
दिनांक २२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास मा.पोलीस निरीक्षक श्री.संदीप पाटील, यांना गुप्त बातमीदारामर्फत मिळालेल्या माहिती वरून चाळीसगाव शहरातील मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे सुरू असलेल्या छन्ना मन्ना नावांचा पत्ता जुगाराचा खेळावर धाड टाकण्यात आली. ५ इसमाना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम सह, मोटर सायकल, पत्ता जुगाराचे साहीत्य असा एकुण १,७२,०००/-रूपये कींमतीचा मुद्देमाल मिळुन आला. म्हणुण चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. ३०/२०२४ महाराष्ट्र जुगार कायदा. कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, पोलीस हेड.कॉन्स्टेबल नितिन वाल्हे, पोलीस नाइक भुषन पाटील, पोलीस नाइक महेंद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भरत गोराळकर, पोलीस कॉन्स्टेबल राकेश महाजन, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील अश्यांनी केली व पुढील तपास हा पोलीस नाइक भुषन पाटील हे करीत आहेत.