एक माणूस तुम्हाला चांगलं या तालुक्यात बोलत नाही, सगळी जनता तुम्हाला शिव्या घालते – आ.मंगेश चव्हाण

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – चाळीसगावात गृहमंत्री अमित शाह यांची भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, माझा स्वभाव पूर्ण तालुक्याने पाहिला आहे. जे बोलेल ते तोंडावर बोलेल एक माणूस मला तालुक्यातून आणून दाखवा, आम्हाला मंगेश दादाने खोट आश्वासन दिले, आमच्याशी खोटं बोलला, दिलेला शब्द पाळला नाही असा एक माणूस इथे आहे का आणि माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने दिलेला शब्द पाळला असा सांगणारा माणूस या तालुक्यात भेटेल का, पण त्या माणसाची पाची अशी पुजली गेलेली आहे की खर बोलणं त्याच्या रक्तात बिलकूल नाही, चाटा मारणे इथूनच ते सुरुवात करतात.
आ.मंगेश चव्हाण यांचा माजी खा.उन्मेष पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल
२०१४ ला आपण का म्हणून आमदार केलं या माणसाला, त्यावेळची आश्वासाने आठवा, काय काय बोलला, बेलगंगा माझी माय आहे, यानेच सुरुवात केली बेलगंगेच्या वेळेस इतकी भाषण केली की, ज्यांना शिव्या घातल्या आज अशी वेळ आली त्यांच्या दाराशी लोटांगण घालाव लागतय, स्वतःचा फोटो छोटा आणि त्यांचा फोटो मोठा लावून मत मागत फिराव लागताय. त्या १० वर्षे राजकारणात राहून, या छत्रपती शिवाजी महाराज चौकात या अरे एक माणूस तुम्हाला चांगलं या तालुक्यात बोलत नाही, सगळी जनता तुम्हाला शिव्या घालते.
२०१४ ला पठ्ठ्याला आपण आमदार केलं, म्हणे बेलगंगा आमची माय आहे. तो विकला जायला नको म्हणून आंदोलन उभी केली, पायी पदयात्रा काढली, जर बेलगंगा तुमची माय होती, ती विकली जायला नको होती, अरे घ्या तुमच्या आईची शपथ, तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर केलेत आणि उमंग शुगरच्या नावाने वसंत सहकारी साखर कारखान्याचे टेंडर तुम्ही घेतल. स्वतःची इथली आई सांगायची आणि शेजारची आई विकत घ्यायला जायचे अरे हा कुठला न्याय आहे.
या माणसाने एमआयडीसीमध्ये सर्व उद्योजकांना त्रास दिला. या एमआयडीसीमध्ये नोकरीच्या नावाने पैसे घेतलेत. या गावात टेक्सटाईल पार्क आणेल, या गावात आंतरराष्ट्रीय गणित नगरी उभी करेल, जागतिक लेव्हलचे लोक इथे येतील, काय झालं जागतिक लेव्हलच, एक कुत्र तिथे आल नाही. साधा तिथे एक ब्रिज केला, त्या पाटणादेवी च्या नावाने राजकारण केलं, त्या ब्रीज वाल्याला पैसै दिले नाहीत म्हणून तो कॉन्ट्रॅक्टर लोखंडाचा ब्रिज खोलून घेऊन गेला, ही पाटणादेवी आता कोपल्या शिवाय राहणार नाही.
विकासाच्या गप्पा मारल्या जनतेमध्ये मोठे-मोठी भाषण ठोकली. लोकांना सांगितलं की आपण आता तालुका बदलू, गांव बदलू मात्र काहीही केले नाही. नगरपालीका, बाजार समितीच्या निवडणुकीत खोटी आश्वासने दिली. शिवाजी महाराज चौकात ५ कोटी खाल्ल्याचा माझ्यावर आरोप केला. महाराजांच्या चौकाच्या कामात पैसा खाणारी माझी औलाद नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येवून समोरासमोर खुली चर्चा करावी असे थेट आव्हानच आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले. रेल्वे स्टेशन रोड पासून सुरु होणाऱ्या कामाची ५ कोटी रूपयांची मान्यता होती तर शिवाजी महाराज चौक व शिल्प फक्त २५ लाखात झाले. २५ लाखात चौकाचे काम करून दाखवा असे सांगत उन्मेष पाटील यांनी आमदार तर सोडाच दरेगावचे सरपंच होवून दाखवावे असे आव्हान मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिले. तसेच या षढयंत्री माणसाला आपल्याला घरी बसवायचे आहे असेही मंगेश चव्हाण म्हणाले.
या तालुक्यात ग्रामीण भागात चित्र बदलत आहे. मी दलाली खाल्ली असती तर अशी कामे झाली नसती. ते आमदार असतांना तालुक्यात दुष्काळ असतांना किती निधी आणला? मी वर्षभरात गेल्या २० वर्षात शेतकऱ्यांसाठी आले नसेल एवढे अनुदान या वर्षात आणले. शेतकऱ्यांवर अनेक संकटे आली पण त्यांना वाऱ्यावर सोडले नाही. त्यांच्या अडचणींसोबत राहीलो. त्यांच्या मदतीची कायम भूमिका घेतली. सर्व समाज माझ्या सोबत आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्व अडचणीत तुमच्या सोबत राहील. पाच वर्षांत केलेली कामे जनतेने पाहिली. ग्रामपंचायत कामगार च्या मुलाला आमदार केले, तुमच्या विश्वासाला तडा जाईल असा विश्वासघात करणार नाही. येणारे ७ दिवस भाजपा व मंगेश साठी द्या ५ वर्ष मी तुमच्यासाठी देईल असेही आ.मंगेश चव्हाण यावेळी म्हणाले.