श्री.विनोदभाऊ कुमावत यांचा मंत्री मां. गिरीश भाऊंना कॉल ! तर दीव्यांग बांधवांसाठी गिरीश भाऊंची तात्काळ मदत…

श्री.विनोदभाऊ कुमावत यांचा मंत्री मां. गिरीश भाऊंना कॉल ! तर दीव्यांग बांधवांसाठी गिरीश भाऊंची तात्काळ मदत…
प्रतिनिधी इम्रान शेख. (कासोदा)
पाचोरा – भोजे चिंचपुरे येथील कुमावत समाजातील जन्मतः दोन्ही पायाने दिव्यांग असलेले ४६ वर्षीय श्री.विठ्ठल कांतीलाल कुमावत हे भोजे येथे राहतात. या दिव्यांग समाज बांधवांचे लहानपणीच मातृ छत्र हरपलेले आहे.
जामनेर या ठिकाणी कै.राजेश भरत कुमावत यांच्या उत्तरकार्यात कुमावत बेलदार समाजाचे जिल्हा अध्यक्ष श्री विनोद (बापू) मोतीलाल कुमावत गेले असता. त्यांची भेट दीव्यांग श्री.विठ्ठल कांतीलाल कुमावत यांच्याशी झाली.
सदर भेटी दरम्यान दिव्यांग श्री.विठ्ठल कांतीलाल कुमावत यांनी समाजाचे जिल्हा अध्यक्ष श्री. विनोद (बापु) मोतीलाल कुमावत यांना त्यांची संपूर्ण आपबिती, होणारा त्रास लक्षात आणून दिला व फीरण्यासाठी तीन चाकी सायकल मिळवून दया असे सांगितले.
त्यावर श्री विनोद (बापु) मोतीलाल कुमावत यांनी दिव्यांग समाजबांधव याची सद्यस्थती पाहून कुठलीही विचारपूस न करता, कोणत्याही कागदपत्राची मागणी नकरता ग्राम विकास मंत्री मा.गिरिशभाऊ महाजन, यांच्या सोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा करून सदर हकीकत सांगितली मा. गिरीश भाऊंना सांगितली. त्यावर मां. गिरीश भाऊ यांनी सुद्धा श्री विनोद भाऊ यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्यांची मागणी पूर्ण करून दिली.
दिनांक. २८ फेब्रुवारी रोजी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. शांताराम (अण्णा) दगडु बेलदार, श्री.विलास रतीलाल कुमावत, यशवंत परसराम कुमावत, नाना सुपडू कुमावत, अजय दिलीप कुमावत, श्रीराम गोबा कुमावत, भूमिका लक्ष्मण कुमावत, सुशीला रविंद्र कुमावत, उषाबाई यशवंत कुमावत, दुर्गा संजय कुमावत सह समाजबांधवांच्या उपस्थितीत कोणताही गाजावाजा न करता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले.
सध्या या स्वार्थी जगात जो तो आपला स्वार्थ बघत असतो पण निस्वार्थीपणे सेवा करणे हीच खरी जनसेवा हीच ईश्वरसेवा हे सिद्ध केले आहे. त्यामुळे कुमावत बेलदार समाजाचे जिल्हा अध्यक्ष विनोद (बापु) मोतीलाल कुमावत यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तसेच एका कॉल वर लगेच मदत केल्यामुळे कुमावत बेलदार समाजाने ग्रामविकास मंत्री मां. गिरीश भाऊ महाजन यांचे सुद्धा आभार मानले आहे.