नानासाहेब य.ना.चव्हाण महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – दि.७/१/२०२५ रोजी नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात स्वा.सै. कर्मवीर शिक्षणमहर्षी नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सव वर्षानिमित्ताने राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर यांच्या शुभहस्ते आणि एम.के. पाटील, माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेत, संस्थेचे चेअरमन डॉ. विनायक चव्हाण, संस्थेचे सचिव प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, संस्थेचे सहसचिव रावसाहेब साळुंखे, भैय्यासाहेब पाटील, प्रमोद पाटील, आर्कि. धनंजय चव्हाण, अँड.साहेबराव पाटील, सुनील देशमुख, बारीकराव वाघ, सौ.अलका बोरसे, भाऊसाहेब पाटील, महेश चव्हाण, सोनूसिंग राजपूत, तात्यासाहेब निकम, हरीश महाले, शरद मोराणकर, सौ.उज्वला पाटील, अनिल कोतकर, कर्तारसिंग परदेशी, माजी प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य वाय.आर.सोनवणे, उपप्राचार्य डॉ.उज्वल मगर, उपप्राचार्य डॉ.जी.डी. देशमुख, उपप्राचार्य डॉ.मनोज शितोळे, मुकेश पवार इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन आणि स्व.नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उद्घाटन केले. उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.बी.शेळके आणि राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य वाय.आर.सोनवणे यांनी केले. पोलीस निरीक्षक चाळीसगाव उद्घाटनपर मनोगतात म्हणाले राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड या संस्थेचा वटवृक्ष झालेला असून ही संस्था महाराष्ट्रातील नामांकित अशी एक संस्था आहे. महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्था आणि राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड ही संस्था ग्रामीण परिसरातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचे काम करीत आहेत.
तसेच वक्तृत्व स्पर्धेचे मराठी भाषा अभिजात झाली पण जगेल काय?, संविधान… माणुसकीचा धर्मग्रंथ, कृत्रिम बुद्धिमत्ता संधी की आव्हान, ईव्हीएम शिवाय निवडणुका शक्य आहेत का ?, महिला सुरक्षा – तिची सुरक्षा कोणाच्या हाती ? रतन टाटा जीवनाचे नम्र उपासक ,मित्र वणव्यामध्ये… गारव्यासारखा… असे विषय वकृत्व स्पर्धेत घेतलेले असल्याकारणाने स्पर्धक विद्यार्थी सर्व विषयांवर वैचारिक मंथन करतील आणि तो संदेश समाजापर्यंत पोहोचेल असा आशावाद व्यक्त करून सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
एम.के.पाटील माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री, आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, नानासाहेबांमुळेच या परिसरात शिक्षणाचा विकास झाला. ग्रामीण भागातील शिक्षणाचा वसा नानांनी घेतला. आज या शिक्षण संस्थेचे रूपांतर वटवृक्षात झालेले आहे.या संस्थेतून शिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी भारतात आणि भारताबाहेर विविध पदांवर आपल्याला काम करताना दिसत आहेत. याचे खरे श्रेय म्हणजे कर्मवीर शिक्षणमहर्षी नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण यांना दिले जाते. कारण नानासाहेबांनी जर चाळीसगावात ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह चालू केले नसते तर परिसराचा विकास झाला नसता, त्यांनी संस्थेची स्थापना न करता जर वकिली केली असती तर नानासाहेबांनी वकिलीतही प्रगती केली असती परंतु चाळीसगाव परिसराचा विकास साधला गेला नसता. विद्यार्थी घडले नसते. म्हणून नानांनी शिक्षण या क्षेत्रात पवित्र कार्य केले असेच आपल्याला ठासून म्हणता येते.
नानासाहेबांच्या स्मृतीच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धा या ऐतिहासिक स्पर्धा ठरलेल्या आहेत. वक्तृत्व स्पर्धेच्या विषयांची विविधता वैचारिक मंथन करण्यासारखी आहे. तसेच या स्पर्धेला देणगीदारही मिळालेले आहेत, यातच स्पर्धेचे महत्त्व लक्षात येते.आपण नानासाहेबांच्या कार्यांचा, विचारांचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे असे उपस्थितांना आवाहन केले. राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ.जी.बी.शेळके, राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य वाय.आर.सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्या डॉ.उज्वल मगर,उपप्राचार्य डॉ.जी.डी.देशमुख, उपप्राचार्य डॉ .मनोज शितोळे तसेच संयोजन समिती प्रमुख श्री.मुकेश पवार, प्रा.के.पी. रामेश्वरकर,प्रा. तुषार चव्हाण प्रा. मनोज देशमुख,प्रा. सचिन निकम, सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. ईशस्तवन, स्वागत गीत प्रिया माळी, तन्वी माळी आणि ऋतुजा गांगुर्डे यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.बी.शेळके यांनी केले.सूत्रसंचालन मुकेश पवार आणि आभार डॉ.मनोज शितोळे यांनी व्यक्त केले. प्रा. पाटील डी.बी.धुळे, प्रा. दिपाली अमृतकर नासिक,प्रा. प्रियंका लढे नासिक हे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत.व्ही.बी.मोरे आणि पांडुरंग सोनवणे यांनी नाव नोंदणीसाठी सहकार्य केले. या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्रातील ५९ स्पर्धक सहभागी झाले आहेत.