भडगाव व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची कार्यकारणी घोषित
तालुका अध्यक्षपदी अशोक परदेशी, शहराध्यक्षपदी संजीव शेवाळे यांची निवड.
कार्यकारी संपादक – संजय महाजन
भडगाव – ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी आणि पत्रकारांच्या व पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी संघटना व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृहात ४ जानेवारी रोजी घेण्यात आली. यामध्ये भडगाव तालुका व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यात तालुकाध्यक्षपदी अशोक परदेशी यांची तर शहराध्यक्षपदी संजीव शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली.
ही बैठक संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री.संदीपजी काळे, प्रदेशाध्यक्ष श्री.अनिल जी मस्के, प्रदेश सरचिटणीस श्री.डिगंबरजी महाले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री.मिलिंदजी टोके यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाध्यक्ष श्री.कल्पेश महाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीची सुरुवात संघटनेचे ध्येय व उद्दिष्टे, संघटनेच्या कार्याची संपूर्ण माहितीने करण्यात आली. व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना तळागाळातील पत्रकारांपर्यंत पोहोचवावी, याच अनुषंगाने भडगाव तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुखपदी विठ्ठल मराठे, जिल्हा संघटकपदी संजय महाजन, भडगाव तालुका अध्यक्षपदी अशोक परदेशी, तालुका उपाध्यक्षपदी विलास पाटील, तालुका कार्याध्यक्षपदी संजय सोनार, तालुका कोषाध्यक्षपदी संजय कोतकर, तालुका सचिवपदी नरेंद्र भोसले, तालुका संपर्कप्रमुखपदी निलेश पाटील, तालुका संघटकपदी अमिन पिंजारी, तालुका सहसंघटकपदी पंकज पाटील यांची निवड करण्यात आली.
तसेच शहर कार्यकारणीमध्ये शहराध्यक्षपदी संजीव शेवाळे, शहर उपाध्यक्षपदी गणेश पाटील, शहर कार्याध्यक्षपदी गणेश अहिरे, सदस्यपदी रवींद्र पाटील, सल्लागारपदी शिवदास महाजन, आत्माराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित तालुका शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.