मेहुणबारे पोलीसांकडून वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करणारा आरोपीला अटक.

(उपसंपादक – कल्पेश महाले)
चाळीसगांव:- अनेक कंपनीच्या बॅटऱ्या चोरणारा संशयित इसम शेख शफिक शेख सलीम वय ३८ वर्षे रा.नटराज थिएटर जवळ,भाभा नगर, धुळे यास मेहूणबाऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहास आव्हाड , पो.हे.कॉ.गोकुळ सोनवणे, पो.हे.कॉ.सचिन निकम, पो.कॉ.निलेश लोहार, पो.कॉ. राकेश काळे यांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता वाहनांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या १० बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली.
राहुल विश्वास पाटील रा.बहाळ ता.चाळीसगांव यांनी १३/०८/२०२४ ला मेहुणबारे पोलीस स्टेशनला वाहनांच्या एकूण १० वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॅटऱ्या चोरी गेल्याबाबत तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्याचा तपास मेहुणबाऱ्याचे पोलीस करीत करताना पोलीसांना संशयित आरोपीची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने वरील इसमाला ताब्यात घेतले होते. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा साथीदार हमीद ऊर्फ नाट्या अन्सारी रा.धुळे हा फरार आहे.त्याचा शोध पोलीस घेत आहेत.आरोपींकडून वाहनाच्या बॅटऱ्या चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली हुंडाई कंपनीची ॲक्सेट कार देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर धुळे व परीसरात अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
नागरिकांनी आपले वाहने रोडच्या कडेला लावून न ठेवता ते सुरक्षित स्थळी पार्क करुन लॉक करावीत. म्हणजे वाहन चोरी होणार नाही. असे आवाहन मेहुणबारे पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी केले आहे.