मराठा सेवा संघाच्या वतीने चाळीसगांव तहसिलदारांना निवेदन

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – रोजी मराठा सेवा संघाकडून तहसील कार्यालय येथे प्रशांत कोरटकर याने महाराजांबद्दल फोन द्वारे अपमानास्पद शब्द बोलून जो महाराजांचा आणि समाजातील शिवप्रेमींचा अपमान केला अशा प्रशांत कोरटकर या समाजकंटकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून लवकरात लवकर अटक करा. तसेच नुकतेच विधानसभेमध्ये एक अत्यंत नीच व घाणेरड्या प्रवृत्तीचा अबू आजमी नामक समाजवादी पक्षाचा आमदाराने औरंगजेबाची स्तुती त्या ठिकाणी केली त्याचा निषेध करुन विधानसभेतून निलंबित करावे. हे वक्तव्य करून जर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे असे घाणेरड्या बुद्धीचे लोक करत असतील तर यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने चाळीसगांव तहसिलदारांना निवेदनाद्वारे सर्व शिवप्रेमी कडून करण्यात आली आहे.
यावेळी मराठा सेवा संघाचे प्रदीप देशमुख तालुकाध्यक्ष कुणाल पाटील, अरुण पाटील, डॉ.अजय पाटील, नितीन पाटील, प्रवीण बोरसे, राकेश राखुंडे, नितेश पाटील, राजीव जाट, प्रवीण पाटील, तसेच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.