भडगांव पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार ५०,०००/- रुपयांची लाच घेतांना जळगाव एसीबीच्या जाळ्यात

भडगांव पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार ५०,०००/- रुपयांची लाच घेतांना जळगाव एसीबीच्या जाळ्यात
उपसंपादक – कल्पेश महाले
भडगांव – वाळू वाहतूक सुरळीत करण्यासाठी तसेच त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी शहरातील तक्रारदार पुरुष, वय वर्ष 28 याचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून त्याच्यावर यापूर्वी भडगाव पोस्टेला अवैध वाळू वाहतुकी संदर्भात दोन गुन्हे दाखल आहेत.
याबाबत भडगाव पोलीस स्टेशन येथील हवालदार किरण पाटील याने तक्रारदाराकडे २,६०,०००- रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी जळगांव एसीबीकडे तक्रार दिली होती. सदर तक्रारीची २५ जुलै रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, पोलीस हवालदार किरण पाटील यांनी तक्रारदाराकडे २,६०,०००/- रूपये मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचासमक्ष ५०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारतांना किरण पाटील यास रंगेहात पकडण्यात आले. याबाबत भडगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नुकताच हवालदार किरण पाटील याचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळालेला तक्रारीनुसार त्याच्यावर रंगेहाथ लाच स्वीकारतांना पकडल्याची कारवाई झाल्याने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावकर, पोलीस अधीक्षक ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, श्री.माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक ल.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सुहास देशमुख पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सूर्यवंशी जळगाव युनिट यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.