कासोदा हरिनाम सप्ताह पंच मंडळाची कार्यकारणी जाहीर, अध्यक्षपदी सोनू शेलार..

कासोदा हरिनाम सप्ताह पंच मंडळाची कार्यकारणी जाहीर, अध्यक्षपदी सोनू शेलार..
प्रतिनीधी इम्रान शेख
कासोदा : एरंडोल तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या कासोदा येथे हरिनाम कीर्तन सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. कासोदा येथील हरिनाम कीर्तन सप्ताह ची काकडा आरती ही खूप प्रसिद्ध आहे. या काकडा आरती ला हजारो भाविक उपस्थिती देतात म्हणूनच हा हरिनाम कीर्तन सप्ताह मोठा चर्चेचा विषय असतो.
यासाठीच कासोदा गावात सप्ताह नियोजन साठी चक्क ग्रामपंचायत सारखी निवडणूक प्रक्रिया पार पडत असते. त्याच अनुषंगाने सालाबादाप्रमाणे भाद्रपद पौर्णिमेला होणारा हरिनाम सप्ताहाची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली.
यात कासोदा येथील नामवंत पै.सोनू नारायण शेलार यांची अध्यक्ष पदी एकमताने व उपाध्यक्षपदी अशोक घोडके, वाल्मीक ठाकरे, सचिव पदी संतोष चौधरी व रवी मोरे आणि खजिनदारपदी गोपाल पांडे यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया फार अटीतटीने पार पडली.
हरिनाम निर्तन सप्ताह कार्यकारणी मध्ये निवड झालेल्या सर्व सभासदांचे सत्यकाम न्युज च्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन…