रोटरी क्लब ऑफ चाळीसगावचा ५४ वा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न.

रोटरी क्लब ऑफ चाळीसगावचा ५४ वा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न.
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – येथील रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव चा पदभार मावळते अध्यक्ष रोटे ब्रिजेश पाटील यांचेकडून नूतन अध्यक्ष रोटे अनिल मालपुरे यांच्याकडे सोपविण्यात आला. तसेच मावळते सचिव रोटे चंद्रेश लोडाया यांचेकडून नूतन सचिव निलेश शर्मा यांनी पदभार स्वीकारला.
सदर पदग्रहण सोहळ्यासाठी रोटरी प्रांत ३१३१ चे पीडीजी रोटे डॉ. दीपक शिकारपूर हे प्रमुख अतिथी म्हणून व प्रांत ३०३०, विभाग ९ चे सहाय्यक प्रांतपाल रोटे अभिजीत भांडारकर विशेष अतिथि म्हणून उपस्थित होते.
रोटरीचे मावळते अध्यक्ष रोटे ब्रिजेश पाटील यांनी त्यांच्या काळातील कार्याचा लेखाजोखा मांडला.नूतन अध्यक्ष रोटे अनिल मालपुरे यांनी नवीन वर्षात गोरगरिबांसाठी, शोषितांसाठी, वंचितासाठी समाजपयोगी व आरोग्यकारी कार्य करण्याचे मनोगत व्यक्त केले.
सदर पदग्रहण समारंभात रोटरीचे क्लबच्या नवीन २५ सदस्यांना मानपत्र देऊन समाविष्ट करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांची ओळख माजी अध्यक्ष डॉ सुनील राजपूत यांनी करून दिली आणि प्रमुख पाहुणे डॉ दीपक शिकारपूर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, एकदा रोटरीचे सदस्यत्व स्वीकारले की तो व्यक्ती जन्मभरासाठी समाजसेवक होतो.
समाजाची सेवा करण्यासाठी आवश्यक असतो तो म्हणजे मनाचा पक्का निश्चय आणि दातृत्वाची साथ चाळीसगाव रोटरी क्लबला ५४ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे तर चाळीसगाव क्लब द्वारे खूप मोठी भरीव कामगिरी होऊ शकते त्यासाठी नावीन्यपूर्ण कार्यपद्धती अवलंबली पाहिजे.
चाळीसगाव पंचक्रोशीत नागरिकांसाठी आरोग्याची उत्तम व्यवस्था, विद्यार्थ्यांकरीता आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी असलेल्या शिक्षणाची सुविधा तर नवयुवकांसाठी रोजगाराच्या संधी केवळ चाळीसगावातीलच नव्हे तर पुण्याचे व अन्य इतर मोठ्या शहरातील तरुण चाळीसगावात उद्योगासाठी येऊ शकतील अशा प्रकारची व्यवस्था माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना निमंत्रित करून होऊ शकते, त्यासाठी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव ने पुढाकार घ्यावा असे मत मांडले असून रोटरी सर्वसामान्यांसाठी आहे आणि सामान्य माणसाला अनन्यसाधारण कामगिरी करण्याची संधी देते ज्या माध्यमातून संपूर्ण समाजाची व आपल्या राष्ट्राची प्रगती होऊ शकते.
सर्व मोठ्या व्यक्ती अत्यंत कष्टातून उद्योग व्यवसाय उभारून मोठ्या झाल्यात. आधुनिक तंत्रज्ञान परदेशी भाषेचे अवलोकन व काळानुसार व्यवसायामध्ये केलेले बदल व्यवसायात आवश्यक असतात.
त्यांना ज्या ज्या मोठ्या व्यक्ती भेटल्या त्यांचे सुखद अनुभव त्यांनी कथन केले. शिक्षणाच्या जोडीला व्यावहारिक ज्ञान व कौशल्य याची सांगड घातल्यास जीवन समृद्ध होते.
एजी रोटे अभिजीत भांडारकर यांनी प्रांतपाल राजिंदर खुराना यांच्या वतीने संदेशवाचन केले.श्रावणी कोटस्थाने हिने सुमधुर आवाजात स्वागत गीत गायले,सदर कार्यक्रमाचे वेळी प्रत्येक व्यक्तीस वृक्षरोपणासाठी सीड बॉल वाटण्यात आले.
सूत्रसंचलन प्रा. विजय गर्गे व डॉ सुनील राजपूत यांनी केले तर आभार सचिव निलेश शर्मा यांनी मानले.
या यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौ.कविता नेरकर, प्रांत अधिकारी प्रमोद हिले, प्रतिभा मंगेश चव्हाण व भैय्यासाहेब पाटील उपास्थित होते.