सैन्यदलात असलेल्या कजगावच्या युवकाने वाचवले वृध्द महिलेचे प्राण

कार्यकारी संपादक – संजय महाजन
कजगाव – भडगाव तालुक्यातील कजगाव येथील रहिवाशी व भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या युवकाने रेल्वेत तोल जाणाऱ्या वृध्द महिलेचे प्राण वाचवल्याने त्या युवकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुनील साठे, सैनिक (आय.टी.बी.पी.)
कजगाव येथील रहिवासी व भारतीय सैन्यदलात आयटीबिपी ह्या फोर्स मध्ये आसाम राज्यात कार्यरत असलेल्या सुनील गोटिराम साठे ह्या सैनिकाने भुसावळ स्थानकावर रेल्वेतून पडणाऱ्या सुमित्रा परदेशी वय ७० या वृद्ध महिलेचे प्राण वाचवले आहे, सदरील महिला ही नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेतून उतरत असतांना त्यांचा तोल अचानक खाली गेला व तेथेच आपल्या गाडीची वाट पाहणाऱ्या सुनील साठे यांनी समयसूचकता दाखवून मोठा आपघात होण्यापासून वृध्द महिलेला वाचवले आहे सदरील महिला नगरदेवळा येथील रहिवासी असून त्यांनी जवानाने दाखवलेल्या धडासाबद्दल व आपले जीव वाचवल्या बद्दल सैन्यदलातील जवानाचे आभार मानले सदरील प्रकार ज्या भुसावळ येथे घडला तेथील प्रवासी व रेल्वे कर्माऱ्यांनी जवानाच्या धाडसाचे कौतुक केले आहे.