चाळीसगाव शहर पोलीसांची कारवाई, घरफोडीतील आरोपी अटक करुन मुद्देमाल हस्तगत.

चाळीसगाव शहर पोलीसांची कारवाई, घरफोडीतील आरोपी अटक करुन मुद्देमाल हस्तगत.
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगांव – शहरातील दि. ०१/०६/२०२४ रोजी प्रल्हाद शंकर पवार वय ४० वर्ष व्यवसाय भाजीपाला विक्री रा. सुर्वणाताई नगर, चाळीसगाव यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे दि. ०१/०६/२०२४ रोजी सकाळी ११:०० वा.ते दुपारी २:४५ वाजेच्या त्याचे राहते घराचे बंद दरवाजा उघडुन कोणीतरी अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करुन घरातील पत्र्याची पेटी व तिच्यातील २० हजार रोख रक्कम चोरुन नेल्याची तक्रार दिली होती.
त्यावरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २३७/२०२४ भादवि कलम ३८०/४५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर तक्रारदार हा अत्यंत गरीब घरातील असुन त्याने थोड थोड करुन सदरचे पैसे जमा केले होते.
सदर गुन्ह्याचा तपासबाबत मा.पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक, श्री.अभयसिंह देशमुख यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स.पो.नि सागर ढिकले यांनी, पो.उप.नि संदीप घुले, पो.हे.काँ अजय पाटील, पो.ना दिपक पाटील, पो.ना तुकाराम चव्हाण, पो.काँ अमोल भोसले, पो.काँ नंदकुमार महाजन, पो.काँ मोहन सुर्यवंशी, यांचे पथक तयार करुन तपासकामी रवाना केले.
सदर पथकांने गोपनीय माहीतीच्या आधार आरोपी नामे १) संजय सुभाष मरसाळे वय २० रा सुवर्णाताईनगर चाळीसगाव २) ऋतिक किशोर जाधव वय २१ रा सुवर्णाताईनगर चाळीसगाव ३) अविनाश लक्ष्मण पाखले वय २१ वर्षे सुवर्णाताईनगर चाळीसगाव जि. जळगाव यांना अटक करुन त्यांच्याकडुन गुन्ह्यातील चोरी केलेली रोख रक्कम जप्त केलेले आहे. मा.न्यायालया कडुन आरोपीला २ दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला असुन, सदर गुन्ह्याचा तपास पो.हे.काँ अजय पाटील व पथक करित आहे.
तरी नागरीकांना चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन मार्फत आव्हान करण्यात येत आहे की, कोणी संशयीत इसम चाळीसगांव शहरात फिरत असल्यास त्यांची माहीती तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे, जेणे करून चोरीच्या गुन्ह्यांना पायबंद घालणेकामी पोलीसांना मदत होईल आणि आपले चाळीसगांव शहर हे सुरक्षीत राहील. असे आवाहन सागर ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांनी केलेले आहे.