लोणपिराचे येथील माजी सरपंचसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासहेब ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश

(कार्यकारी संपादक – संजय महाजन)
कजगाव:- भडगाव तालुक्यातील लोण पिराचे येथील भडगाव तालुक्यात शिंदे गटाला खिंडार पडले असून, माजी सरपंच अशोक रामभाऊ पाटील यांच्या सह असंख्य कार्यकर्ते व महिला व तरुणांनी वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश करून शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. लोणपिराचे येथे दि.१४ ऑक्टोबर सायंकाळी गावातील शाळेच्या पटांगणात भव्य प्रवेश सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी असंख्य ग्रामस्थांच्या व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावातील ग्रामस्थांनी व तरुणांनी व महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटात जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात आलेले सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.