विना परवाना रेती वाहतूक करणाऱ्या विरुद्ध मेहुनबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
विना परवाना रेती वाहतूक करणाऱ्या विरुद्ध मेहुनबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
चाळीसगाव ता. प्रतिनिधी कल्पेश महाले.
मेहुनबारे पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप परदेशी व पोलीस उपनिरीक्षक गोपाळ पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शिंदे सोबत पोलीस कॉन्स्टेबल गोरक चकोर, जितूसिंग परदेशी, निलेश लोहार, भूषण बाविस्कर, अशोक राठोड, पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गिरणा नदी पात्राकडून दसेगाव-उंबरखेड रोडवर अचानक निळ्या रंगाचा सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर जात असताना दिसून आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी व सोबत असलेला स्टाफ यांना संशय आल्याने सदर ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर चालकास विचारपूस केली. ट्रॅक्टर चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यावरून संशय आल्याने ट्रॉलीमध्ये डोकावून बघितले असता सदर ट्रॉलीमध्ये रेती मिळून आल्याने, ट्रॅक्टर चालकास वाळू वाहतूक परवाना बाबत विचारणा केली असता तसा कोणताही परवाना नसल्याबाबत सांगितल्याने सदर ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर पोलीस स्टेशन आवारात जमा करून सदर इस्माविरुद्ध मेहुनबारे पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल निलेश गोकुळ लोहार यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद वामन शिंदे हे करीत आहे.