कासोदा पोलिसांची कामगिरी, चोरी गेलेल्या ट्रॅक्टर सह आरोपीस अटक
प्रतिनिधी इम्रान शेख (कासोदा)
कासोदा : कासोदा पोलीस स्टेशन गुरनं. १७५/२०२३ भादवि कलम ३७९, ३४ आर्म अॅक्ट कलम ४, २५ प्रमाणे दिनांक १८/११/२०२३ रोजी दाखल असुन, सदर गुन्ह्यातील आरोपी नामे प्रविण भाईदास कोळी, रा. २४, रा. विखरण ता. एरंडोल जि. जळगांव याने त्याचे दोन साथीदारां मार्फत ताडे ता. एरंडोल, जि. जळगांव येथील शेतकरी नामे अनिल लोटन पाटील यांचे मालकीचे लाल-पांढऱ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर नं. MH १९ BG ८०९१ व त्यास लावलेले रोटेव्हिटरसह चोरुन नेले होते.
सदरचे ट्रॅक्टर हे सिल्लोड जि. संभाजी नगर कडेस आरोपी हे घेऊन जात असतांना त्यास बसविलेल्या GPS सिस्टीमच्या आधाराने फिर्यादी यांनी कासोदा पोलीसांना कळविल्याने कासोदा पोलीस स्टेशन येथील पो.हे.कॉ. नंदकुमार पाटील, पो.कॉ. इम्रान पठाण, चालक स.फौ.मनोज पाटील अशांनी मा. वरीष्ठांच्या परवानगीने सिल्लोड येथे जाऊन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले ट्रॅक्टर आरोपीतासह ताब्यात घेतले. व सदर आरोपीतास सदर गुन्हा केले कामी अटक करण्यात आलेली आहे.
सदर आरोपी पकडणे कामी सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार तसेच SRPF चे पोलीस उपनिरीक्षक दत्तोबा जाधव, पो.कॉ. समाधान काळे, सूनील तलेकर, हेमराज गिरी व राहुल पाटील अशांनी योग्य ती मदत केली असुन, सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.सह.पोलीस निरीक्षक, योगिता नारखेडे यांचे मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ. नंदकुमार नरसिंग पाटील हे करीत असुन, त्यांना सदर गुन्ह्याचे तपासात पो.कॉ. इम्रान पठाण, पो.कॉ. नंदलाल परदेशी, पो.कॉ. जितेश पाटील हे करीत आहेत.