हिरापुर येथील चोरीस गेलेल्या कापसासह एक ॲपेरिक्षा चाळीसगाव ग्रामीण पोलीसांकडून हस्तगत

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – तालुक्यातील हिरापुर शिवारातील दिनांक १६/१०/२०२४ रोजी फिर्यादी सुधीर रामदास शिंदे वय ५९ धंदा शेती रा. हिरापुर ता. चाळीसगाव यांचे दि.१४/१०/२०२४ रोजी दुपारी १२.०० ते दि.१५/१०/२०२४ रोजी सकाळी ०८.३० वाजेचे दरम्यान हिरापुर शिवारातील अंधारी रस्त्यावरील फिर्यादीचे शेत गट क्र ३३० / १ मधील शेड मधुन ३००००/- रु किं ची ३५ प्लॉस्टीक खतांचे गोणी त्यात कापसाने भरलेली अंदाजे ६ क्विटंल कापुस कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला होता म्हणुन फिर्यादीच्या तक्रार दिल्यावरुन चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला भाग ५ गुरनं ३०५ / २०२४ भा. न्या. संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासकामी पोलीस अधीक्षक श्री. डॉ.महेश्वर रेड्डी जळगांव, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचे मार्गदर्शनाखाली हिरापुर गावातील संशयित इसम नामे रोहित रविंद्र सांळुखे वय २० रा. हिरापुर ता. चाळीसगांव यास ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्हयातील चोरीस गेलेले कापुस बाबत सखोल विचारपुस केली असता आरोपी रोहित रविंद्र सांळुखे यांने सांगितले की, मी व माझे साथीदार २)गोकुळ दिनकर पावले वय ४५, ३)भरत विनोद निकुंभ वय २०, तिन्ही रा. हिरापुर ता चाळीसगांव अशांनी मिळुन सुधीर रामदास शिंदे यांचे शेतातील शेडमधील कापुस एका ॲपेरिक्षा मध्ये टाकुन चोरुन नेली होता अशी कबुली दिल्याने सदर आरोपी यांचे कडुन २९०००/- रु किंमतीचा ५ क्विंटल ७५ किलो कापुस व ४००००/- रु किंमतीची एक ॲपे रिक्षा असा एकुण ६९०००/- रु किंमतीचा मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलेले आहे.
चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोहेकॉ. युवराज नाईक, पोहेकॉ. गोवर्धन बोरसे, संदिप पाटील, दिपक नरवाडे, राजेश रावते, पोना. तुकाराम चव्हाण, यापथकासह कारवाई करण्यात आली असुन पुढील तपास पोहेकॉ. दिपक नरवाडे हे करीत आहेत.