Breaking
जळगाव

दहिवद येथील जबरी दरोड्यातील आरोपींना जळगाव पोलीसांनी अखेर मध्यप्रदेश येथून ठोकल्या बेड्या.

0 7 5 1 9 3

दहिवद येथील जबरी दरोड्यातील आरोपींना जळगाव पोलीसांनी अखेर मध्यप्रदेश येथून ठोकल्या बेड्या.

उपसंपादक – कल्पेश महाले

चाळीसगाव:- दि.१२/०५/२०२४ रोजी रात्री ०२.३० ते ०३.०० वाजे च्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पो.स्टे.हद्दीतील दहीवद या गावी घनश्याम धर्मराज पाटील वय २९ रा दहीवद यांच्या राहते घरातील घराच्या पाठीमागे खिडकीचे गज कापुनते वाकुन घरात प्रवेश करुन सात अनोळखी इसमांनी गावठी कट्टयाचा धाक दाखवुन लोखंडी व लाकडी दांड्याने फिर्यादीस मारहाण करुन दरोडा टाकुन १६,७६,०००/- रुपये किमंतीचा मुद्देमाल (त्यात सोन्याचे दागिने व मोबाईल चोरुन नेले) बाबत मजकुराचे फिर्याद दिल्याने मेहुणबारे पोलीसस्टेशन येथे वर नमुद प्रमाणे गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचे तपासकामी वरीष्ठांचे सुचनेवरुन पथक तयार करण्यात आलेले होते. सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मध्य प्रदेश राज्यात जावुन स्थानिक पोलीसांच्या मदतीने भामपुर या अति दुर्गम भागात जावून नियोजन बध्द रित्या माहीती संकलीत करुन सापळा रचुन आरोपी नामे १) कालुसिंग हुजारीया बारेला वय ५२ वर्ष रा.भामपुरा ता. सेंधवा जि.बडवाणी (मध्यप्रदेश) २) सुनिल मुरीलाल बारेला वय-२१ वर्षे रा. बुलवाणिया ता. सेंधवा जि. बडवाणी (मध्यप्रदेश), ३) एक अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालक यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांचे कडुन खालील वर्णनाचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.

१) १०,९२,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे १८२ ग्रॅम दागीने (१८ तोळे सोन्याचे दागिने)

२) ५,००,०००/- रुपये किमतीचे गुन्हयात वापरलेले चारचाकी बोलेरो पिकअप वाहन

३) २०,०००/- किमंतीचीहोंडा शाईन काळ्या रंगाची मोटरसायकल

४) 3000 / किंमतीचा वापरता मोबाईल

५) ००-००/- रुपये किमतीचे हॅकसों ब्लेड (करर्वत)

एकुण १६,१५,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल ताब्यात घेण्यात आलेले आहे.

सदर ची कामगिरी पोलीस अधिक्षक श्री.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर चाळीसगाव परीमंडळ, सहा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री.अभयसिंग देशमुख, चाळीसगाव भाग चाळीसगाव, पोलीस निरीक्षक श्री.किसन नजन पाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, पोलीस उपनिरीक्षक श्री.सुहास आव्हाड, पो.हे.को. १६ मनोहर शिंदे नेम नाशिक गुन्हे शाखा युनिट २., पोहेकॉ १७२० राहुल सोनवणे, पो.हे.कॉ. ६९२ गोकुळ सोनवणे, पो.कॉ १४१९ विजय पाटील , पो.कॉ. २०८ आशुतोष सोनवणे, पो.कॉ. २५४५ रविद्र बच्छे, नेम चाळीसगाव शहर पो.स्टे, पो.कॉ.१६४४ गोरख चकोर नेम मेहुणबारे पोस्टे पो.कॉ. ईश्वर पाटील, पो.कॉ. गौरव पाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी केलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि श्री.संदीप परदेशी व पो.कॉ. २२० निलेश लोहार व पथक करीत आहेत.

3.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 1 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे